Subscribe Us

header ads

बंडखोर आमदार तानाजी सावंत समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली

बीड स्पीड न्यूज 


बंडखोर आमदार तानाजी सावंत समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन; शिवसैनिकाची गाडी फोडली

बीड|प्रतिनिधी-: राज्यात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. एकीकडे शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३८ आमदार फुटले आहेत.तर बंडखोर आमदारांविरुद्ध शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शनिवारी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचं पुण्यातील कार्यालयावर तोडफोड केली. त्यानंतर तानाजी सावंत यांनी चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली.त्यानंतर आता बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ बीड मध्ये कार्यकर्ते पुढे आले आहेत. पुण्यात ज्याठिकाणी सावंत यांच्या कार्यालयात तोडफोड केली. आज त्याठिकाणी काही कार्यकर्त्यांनी फुले वाहण्यात आली. तर दुसरीकडे बीड मध्ये तानाजी सावंत समर्थनार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एका शिवसैनिकाची गाडी फोडली. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आक्रमक पवित्रा घेतल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा