Subscribe Us

header ads

मुक्ताई आणि आजोबा भेटीचा अनुपम सोहळा

बीड स्पीड न्यूज 


मुक्ताई आणि आजोबा भेटीचा अनुपम सोहळा


बीड|प्रतिनिधी-:  शहरातील बालाजी मंदिरात शनिवारी रात्री मुक्कामी असलेल्या संत मुक्ताईच्या पालखीचे रविवारी सकाळी  पाली गावाकडे प्रस्थान झाले. वाटेत बिंदुसरा नदीच्या पुलाजवळील मुक्ताईचे आजोबा गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी सकाळी  मुक्ताई आणि आजोबा गोविंदपंत यांची भेट झाली. नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई असा जयघोष केला. 
     १)......नातीच्या पादुका आजोबांच्या समाधीस्थळी नेण्यात आल्या. यावेळी ब्र. गोविंदपंत महाराज संस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. रामदास जाधव यांनी संत मुक्ताबाईच्या पादुका डोक्यावर घेतल्या. त्यांच्या सोबत संस्थानचे पदसिद्ध सचिव वेदान्त प्रपाठक राधाकृष्ण वाव्हळ, कार्याध्यक्ष वेदान्ताचार्य ह. भ. प. संतोष महाराज तौर, पालखी सोहळा प्रमुख संगीत विशारद गायनाचार्य ह. भ. प. सुग्रीव महाराज डाके व चोपदार ह. भ. प. अर्जुन महाराज शिंदे हे होते. 
..... काय आहे मुक्ताई व बीडचे नाते.... 
    तीनशे वर्षांपूर्वी पासून शेकडो पिढ्या संत मुक्ताईनगर ते पंढरपूर असा पारंपरिक वारी मार्ग होता, मात्र सन २००८ पासून संस्थानचे पदसिद्ध सचिव राधाकृष्ण वाव्हळ यांनी वै. संत निवृत्तीनाथ वक्ते महाराज यांच्या चित्कळा मुक्ताई या ग्रंथातून प्रेरणा घेऊन वक्ते महाराजांच्या मार्गदर्शनाखाली *संत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबा ब्र गोविंदपंत यांचा संशोधनपर ग्रंथ* लिहून तो मुक्ताई संस्थानचे चालक ह. भ. प. रविंद्र हरणे पाटील यांना दाखवून संत मुक्ताईस आजोबांच्या भेटीस येण्याची विनंती केली. त्यानुसार मुक्ताई संस्थानने आजोबाच्या भेटीसाठी वाट वाकडी केली. 
३) *गोविंदपंत यांच्या पत्नी निराबाई या होत. 
४) ढोकळे हे गोविंदपंतांचे वंशज नसून ते मावसभाऊ होते. त्यांच्या मदतीनेच दत्त मंदिर गल्लीत ढोकळा विठोबा ची त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. या श्री विठ्ठलाच्या कृपेनेच पत्नी निराबाईस विठ्ठलपंत हे पुत्ररत्न प्राप्त झाले. याच ढोकळा विठोबाचे पुजारी म्हणून आज रामदासी कुटुंब हे सेवा करीत आहेत. 
५) थोरले माधवराव पेशवे यांच्या काळात या समाधीचा जीर्णोद्धार झाला होता, मात्र काळाच्या ओघात हा इतिहास पडद्याआड गेला. बीड येथील चाकरवाडीचे माउली महाराज, पेठ बीड येथील विठ्ठल मंदिराचे राजाभाऊ पुजारी, नवगण राजुरी येथील अमृत महाराज यांचे चुलते...जोशी, यांनी वेळोवेळी दैनिकात दिलेल्या बातम्यांची कात्रणे गोळा करून, शिवाय त्या काळचे देवगिरीचे यादव राजे यांनी बीड परगण्यास नियुक्त केलेल्या धर्माधिकारी देशमुख वंशाचे आजचे निवृत्त न्यायाधीश अॅड. लक्ष्मीकांतराव देशमुख यांना झालेला साक्षात्कार या सर्व बाबींचा समग्र अभ्यास करून ह. भ. प. राधाकृष्ण वाव्हळ यांनी ग्रंथ निर्मिती केली. 
६) सोहळ्याच्या वतीने...... संस्थानचे अध्यक्ष रामदास जाधव व सचिव राधाकृष्ण वाव्हळ यांनी मुक्ताई संस्थानचे चालक रविंद्र हरणे पाटील यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्याध्यक्ष ह. भ. प. संतोष महाराज तौर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी द्वाराचार्य अमृत महाराज जोशी, श्री मनोज पवार साहेब, श्री अशोक जोगदंड, ह. भ. प. डोंगरे महाराज, श्री महादेव हेंद्रे तसेच महिला भाविक सर्व सौ. शोभा पवार, सौ. पार्वती हेंद्रे, सौ. मंगलाबाई सपाटे, सौ. जोगदंड,सौ.डोंगरे यांच्यासह अनेक भाविक कार्यकर्ते उपस्थित होते. या आजोबा नातीच्या ऐतिहासिक भेटी प्रसंगी बीड येथील सागर स्वीट होम, श्री पटेल यांनी उपस्थित शेकडो भाविकांना दर्जेदार नाश्ता दिला. नात मुक्ताईच्या सोहळ्यातील भाविक आजोबा ब्र गोविंदपंत यांच्या पाहुणचाराने भारावून गेले! भेटीने तृप्त होत जड अंतकरणाने बीडकरांनी पालखीला पंढरपूरकडे मार्गस्थ केले.मुक्ताईने घेतली आजोबा गोविंदपंत यांची भेटमागील ३१० वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून मुक्ताबाईची पालखी पंढरपूरला जाते. बीड शहरात या पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो. बीडकरांच्या सेवेने भारावलेल्या वारकऱ्यांनी पालीकडे प्रस्थान ठेवले. रवीवारी सकाळी साडेसहा वाजता मुक्ताईची पालखी गोविंदपंत यांच्या समाधीस्थळी आली. तेव्हा वारकऱ्यांनी पालखीतील मुक्ताईच्या पादुका डोक्यावर घेत त्या आजोबांच्या समाधीस्थळी नेल्या. समाधीस्थळी गोविंदपंत व मुक्ताई यांच्या पादुकांचे एकत्रित पूजन करण्यात आल्यानंतर आजोबा गोविंदपंत यांच्या पालखी सोहळ्याच्यावतीने साडीचोळी भेट देऊन मुक्ताईची बोळवण करण्यात आली. तेव्हा वारकऱ्यांनी आदिशक्ती मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वर महाराज व गोविंदपंत यांच्या नावाचा जयघोष केला. दोन्ही पादुकांची महाआरती करण्यात आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजोबा व नातीच्या या भेटीचा अनुपम्य सोहळा वारकऱ्यांनी डोळ्यात साठवला. यावेळी मुक्ताई संस्थान पालखी प्रमुख रविंद्र महाराज हरणे यांचा गोविंदपंत पालखी सोहळ्याच्यावतीने ......यांनी सत्कार केला. त्यानंतर मुक्ताईच्या पालखीने पालीकडे प्रस्थान ठेवले. रविवारी या पालखीचा पाली गावात मुक्काम असून सोमवारी सकाळी पालखी मांजरसुंबा घाट पार करणार आहे.                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा