Subscribe Us

header ads

शेती साठी योग्य पाऊस पडावा या साठी महादेवाला साकडे

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

शेती साठी योग्य पाऊस पडावा या साठी महादेवाला साकडे





वाकनाथपुर प्रतिनिधी-: बीड जिल्हात या वर्षी काही भागात आणखीन पाऊसाचे आगमन झाले नाही आणखीन काही भागात पेरणी झालेली नाही जुन महिना संपत आला तरी शेती उपयुक्त पाऊस आणखीन झालेला नाही. या कारणाने बळीराजा खुप चिंतेत आहे. शेतकऱ्यांचे सर्व कुटूंब सर्व शेतीवर अवलंबून असते आणि शेती पिकली नाही तर शेतकरी कर्ज बाजारी 

होतात. याचं बळीराजावर कोणतेही संकट येऊ नये या साठी आज दिनांक २६ जुन रोजी बीड तालुक्यातील मौजे ब्रहानपुर येथे शेतकरी महिलांनी पाण्याच्या घागरी भरून गावातील महादेवाच्या मंदिरात अभिषेक घालुन पाऊस पाडण्यासाठी साकडे घातले. या वेळी गावातील महिलांनी वाजत गाजत पाणी घेऊन मिरवणूक करत भरपूर पाऊस पडला आणि शेतकर्याचे पीक जोमात यावे या साठी प्रथना केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा