Subscribe Us

header ads

थक्कीत वेतना साठी न.प.कामगारांचे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषण.

बीड स्पीड न्यूज 

थक्कीत वेतना साठी न.प.कामगारांचे उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषण.


माजलगाव( प्रतिनिधी): येथील नगरपरिषदेच्या सफाई व इतर विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिण्यां पासून थक्कीत असलेल्याने ते देण्यात यावे या मागणी साठी सामाजिक कार्यकर्ते अनिल साळवे यांच्या नेतृत्त्वाखाली २० कामगारांनी २७ जून सोमवार रोजी पासून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरु केले असुन त्यांच्या उपोषणाला इतर १० कर्मचारी,कामगारांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. याबाबत उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना २० जून रोजी निवेदन देण्यात आले होते त्यात म्हटले होते की, न.प.हद्दीतील स्वछता करण्यासाठी जानेवारी-२०२२ला निविदा देण्यात आली असुन त्या निविदा धारकाने गेल्या दोन महिण्यां पुर्वी पासून तसेच १जुलै ला तीन महिणे पुर्ण होतील असे तीन महिण्यां पासून कामगारांचे वेतन दिलेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारी वेळ आली आहे. आणि शाळा,महाविद्यालये चालु झाल्याने त्यांच्या पाल्यांना प्रवेश ,गणवेशा सह इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी रक्कम नसल्याने ते आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. यासर्व बाबींचा गांभिर्याने दखल घेऊन तात्काळ वेतन देण्यात यावे अशी मागणी केली होती. सदर निवेदनात असेही नमुद करण्यात आले होते. की, संबधीत निविदा धारक व मुख्याधिकारी यांच्यातील वादात कामगारांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे त्यांना न्याय देऊन थक्कीत वेतन देण्यात यावे. या निवेदनाची दखल घेतली नाही तर २७ जून सोमवार पासून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात येईल असे म्हटले होते. शेवटी कंटाळून अखेर २७ जून सोमवार पासून कामगारांनी उपोषण सुरु केले आहे. यात सय्यद बिल्लाल अहमद, पंचशिला शिनगारे ,द्वारकाबाई भिसे, इंदुबाई वाघमारे, नवनाथ लोखंडे,ललीताबाई उजगरे, वैजंताबाई डोंगरे ,शेख युसूफ, प्रदिप भिसे ,अनिकेत थोरात ,सागर रोकडे,गजेन्द्र उफाडे, बाळू लोखंडे, शेख शफीक उस्मान ,सविता फुलवरे,सुनिता उफाडे यांच्या सह २० कामगारांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा