Subscribe Us

header ads

नगरपरिषदेचा गलथान कारभारामुळे पावसाचे पाणी चक्क रस्त्यावरून चौकामध्ये जाम,,

बीड स्पीड न्यूज 


नगरपरिषदेचा गलथान कारभारामुळे पावसाचे पाणी चक्क रस्त्यावरून चौकामध्ये जाम,,


माजलगाव|प्रतिनिधी-: माजलगाव प्रतिनिधी शहरातील सर्व रस्त्यांवर घाणीचे पाणी झाले शहरातील नाल्यांतील घाण पाणी नागरिकांच्या घरात व व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसले याला जबाबदार नगरपरिषदेचा स्वच्छता विभाग असून जनतेने वारंवार मागणी करूनही पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची सफाई झाली नाही त्यामुळे नाल्या तुंबल्याने सर्व घाण कचरा रस्त्यावर बाहेर पडला या पावसामुळे रस्त्यावरील पाण्यामुळे शहरातील नागरिकांची दैना उडाली त्यामुळे आता तरी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने जागे व्हावे कारण पुढे आणखी मोठा पाऊस येणार असून माजलगाव शहरातील तुंबलेल्या नाल्यांमुळे पुन्हा रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना शहरात वागणे कठीण होईल, तसेच वाहनचालकांचा या रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे अपघात होऊ शकतो. याचा विचार नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने करावा त्यामुळे माजलगाव शहरातील सर्व नाल्यांची तात्काळ सफाई करून नाल्यांची सफाई करावी. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब आपण एकदा शहरातील रस्त्यांवर आल्यावरच त्यांना पावसाच्या पाण्यामुळे शहरातील साचलेल्या पाण्याची अवस्था कळेल. तसेच संभाजी चौक ते अंबेकर चौक व पाण्यामुळे  परीसरात फेरफटका मारल्यास परीसरातील तुंबलेल्या नाल्या, साचलेल्या कचरा व कोंडलेल्या नाल्या दिसतील पुढील अनर्थ टाळण्यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने तत्परतेने माजलगाव शहरातील नाल्यांची सफाई करून घ्यावी अशी मागणी  जनतेतून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा