Subscribe Us

header ads

भाटसांगवी येथील पुलाचे काम सुरु होताच बंद; गावकऱ्यांचा आंदोलनचा इशारा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

भाटसांगवी येथील पुलाचे काम सुरु होताच बंद; गावकऱ्यांचा आंदोलनचा इशारा




वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील तुक्कडमोडी या नदीवरचा पुल गेल्या वर्षी अतिवृष्टी मध्ये वाहून गेला होता. हा पुल वाहून गेल्याने सुमारे दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला होता. पूर्ण उन्हाळा गेला तरी या पुलाचे काम काही सुरू झाले नाही. फक्त आश्वासने भेटली या भागातील सर्व नागरिकांनी मिळून या पुलाच्या जागी रोडा टाकून उन्हाळ्यात रस्ता सुरु केला आहे. नदीला पाणी आले तर हा रोडा पूर्ण 

वाहुन जाईल आणि परत रस्ता बंद होईल आणि या सर्व गावाचे दळण वळण बंद होईल आता काही दिवसापूर्वी या पुलाचे काम सुरू झाले आणि लगेच बंद देखील झाले. गेले पंधरा दिवस झाले या पुलाचे काम बंद पाडले आहे. काम थोडे सुरू करून नागरिकांची दिशा भुल होत आहे. काम जर असेच चालु राहिले तर या भागातील नागरिकांचे खुप मोठे नुकसान होईल. या नदीला जर पाणी आले तर या भागातील नागरिकांना नदीच्या अलीकडे येता येत 

नाही आता सध्या शेतीच्या पेरणीचे दिवस आहेत जर नदीला पाणी आले तर शेतीसाठी लागणारे खाते बियाणे शेतकऱ्यांनी कसे आणावे हा मोठा प्रश्न आहे. या भागात सर्व नागरिकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. कोणाला रात्री अपरात्री दवाखान्यात नेण्याची वेळ अली तर कसे न्यावे हा ही मोठा प्रश्न आहे. तरी या पुलाचे काम का बंद आहे. याची चौकशी करून पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी या भागातील सर्व नागरिकांची मागणी आहे. पुलाचे काम जर लवकरात लवकर सुरू झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल अशी या भागात चर्चा आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा