Subscribe Us

header ads

ज्ञानेश्वर कदम शेलगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष पदी निवड.

बीड स्पीड न्यूज 

नांदेड जिल्हा प्रतिनीधी प्रकाश कारलेकर 


ज्ञानेश्वर कदम शेलगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष पदी निवड.





उमरी : ज्ञानेश्वर कदम शेलगावकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.ज्ञानेश्वर पाटील कदम हा सामाजिक बांधिलकी जपणारा व्रतस्थ गेल्या अनेक वर्षापासून  सामाजिक बांधिलकी जपत आणि प्रत्येक समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात खंबीर नेतृत्व माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्याच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे टाकून जनतेच्या उत्थानासाठी आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी सतत खंबीर पणे पाठिशी उभे राहतात ज्ञानेश्वर कदम यांनी आपले सामाजिक क्षेत्रात आपले नवे आयाम शोधतांना आम्ही त्यांच्याकडे पाहतो आहोत. एकनिष्ठ पक्ष मजबूत,मोर्चे,आंदोलने व प्रत्येक सामाजिक क्षेत्रात तळमळ आणि कळकळ असणारा आणि सामान्य माणसाला हवाहवासा वाटणारा हा कार्यकर्ता नेहमीच रंजल्या गांजल्या आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी आणि ज्याच्या पाठिमागे कोणीच नाही अशांच्या पाठीमागे उभा राहून मी तुमच्यासोबत आहे.ही जाणीव देणारा हा एक कार्यकर्ता सामान्य माणसाला आपला वाटत आलेला आहे.सामान्य माणसाच्या आणि  तळागाळातील प्रत्येक समाजाच्या काही समस्या असतील त्या समस्या जाणून घेऊन अगदी निष्ठापूर्वक त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा आणि मोलाचा वाटत आला आहे. सामाजिक कार्य हे क्षेत्र उपेक्षित माणसाला न्याय मिळवून देणारे एक धडाडीचा सामान्य कार्यकर्ता ज्ञानेश्वर कदम यांनी अनेक ठिकाणी वापरून अशा उपेक्षित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.ज्ञानेश्वर कदम हे सामाजिक बांधिलकी जपणारे दृष्टे असून जनतेच्या हितासाठीच अनेक प्रश्नासाठी ही ते सातत्याने आग्रही राहत आले आहेत.ज्ञानेश्वर कदम शेलगावकर यांनी  प्रत्येक सामाजिक क्षेत्रात नेहमीच आपले योगदान दिले आहे. आज पर्यंतच्या त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांची  राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.त्याच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर मा.आ.शंकरराव धोंडगे, उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर प्रा.डि. बी. जांभरूणकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे.यावेळी,डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर, निशांत वाघमारे,धनंजय सुर्यवंशी, भगवान आलेगावकर, कल्पनाताई डोंगळीकर आशा भिसे,वसंत सुगावे, जिगळेकर,गणेश सुर्यवंशी धानोरा बु.वाडीकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा