Subscribe Us

header ads

स्वराज्यनगर परिसरामध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!

बीड स्पीड न्यूज 


स्वराज्यनगर परिसरामध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाशेजारी आढळले पिस्टल!


बीड दि. 8 : शहरातील स्वराज्यनगर परिसरामध्ये एका तरुणाचा बुधवारी (दि. 8) सकाळी मृतदेह आढळून आला. तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मृतदेहाच्या शेजारीच गावठी पिस्टल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.अक्षय भांडवले (वय 38 रा.बार्शी नाका, बीड) असे मयताचे नाव आहे. त्याचा मृतदेह स्वराज्यनगर येथील मारुती-सुझुकी शोरुमच्या जवळ आढळून आला. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड, सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पो.ना.रवि आघाव, गणेश परजणे, विठ्ठल शिंदे, भगवान घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, त्याच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी छिद्र आहे. त्यामुळे खून की आत्महत्या, याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा