Subscribe Us

header ads

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा

बीड स्पीड न्यूज 
 
शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा

बीड|प्रतिनिधी-: एस. टी. चालकास मारहाण केल्याप्रकरणी व शासकीय कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीस शिक्षा केली असून मा. श्री एच. एस महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांनी निकाल दिला आहे.रोजी सुधाकर शामराव सावंत एस. टी. चालक बीड़ आगार यांना त्यांचे शासकीय कामकाजात अडथळा आणून मारहाण केल्या प्रकरणी आरोपी . हिरामण प्रल्हाद चव्हाण रा. इमामपुर यांना मा. प्रमुख जिल्हा व सत्र १. न्यायाधीशसाहेब, बीड श्री. एच. एस. महाजन यांनी दोषी धरून सहा महिने सश्रम कारावासाची व १००० /- रु दंडाची शिक्षा सुनावली.या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी आहे की, २७/०२/२०१७ रोजी एस. टी चालक सुधाकर सावंत हा बीड वांगी मार्गे इमामपुर ही बस घेऊन जात असताना आरोपीने त्याची बस आडवुन त्यास शिवीगाळ केली व चापटा मारल्या व त्याची शासकीय कामकाजात अडथळा केला व नंतर आरोपी विरुद्ध ३५३, ३४९, ५०४, ५०६ भादवी प्रमाणे कायदेशीर तकार दाखल केली, अशी फिर्याद पोलीस स्टेशन बीड ग्रामीण येथे दाखल केली. या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आरोपी याचे विरुद्ध गु. र. क. ३२/२०१७ कलम ३५३, ३४९, ५०४, ५०६ भा. द. वी नुसार गुन्हा दाखल झाला. त्या गुन्हयाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल सातपुते यांचेकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब नोंदवले व आरोपींना अटक करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.सदर प्रकरणामध्ये मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बीड यांचे न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, तपासी अमंलदार व पंच यांचा समावेश आहे.सदर प्रकरणात मा. न्यायालयासमोर झालेला पुरावा व सहायक सरकारी वकील, श्री. अमित पी हसेगावकर यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी १. हिरामण प्रल्हाद चव्हाण यांनामा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशसाहेब बीड श्री एच. एस. महाजन यांनी कलम ३५३ भादवी नुसार दोषी धरून आरोपीस सहा महिने सश्रम कारावासाची व ५००/- रु दंड व कलम ३४१ भादवी नुसार ५००/- रु दंड व दंड न भरल्यास साधा कारावासाची शिक्षा सुनावली.सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे श्री. अमित पी हसेगावकर यांनी काम पाहिले. त्यांना दोषसिद्धी कक्ष अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. बी. बी. जायभाये आणि सहा. फौ. सी. एस. इंगळे, पोलीस हवालदार एस. एम. इंगोले यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा