Subscribe Us

header ads

अवैध दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक; परळी शहर पोलिसांची कारवाई

बीड स्पीड न्यूज 


अवैध दारूसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक; परळी शहर पोलिसांची कारवाई

परळी|प्रतिनिधी-: परळी शहर पोलिसांनी मध्यरात्री मोठी धाडसी कारवाई करीत गस्ती दरम्यान अवैध दारू सह जवळपास १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांनी तिघांना जेरबंद केले असून त्यापिकी दोघे अंबाजोगाई तर एक जण उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, परळी शहर पोलिस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परळी - अंबाजोगाई रोडवर बायपास चौक येथे - पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरित्या उभी केलेली आढळून आली. सदरील ठिकाणी असलेले पीक अप व कार याची तपासणी केली असता पीक अप मध्ये केवळ गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेली प्रतिबंदीत दारू आढळून आली. ज्या मध्ये मॅकडॉल कंपनीच्या १,०७,५२०/- रुपयांच्या १६८० सिलबंद बाटल्या, इम्पेरीयल ब्लु कंपनीच्या ६१,४४०/ रुपयांच्या ९८० बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या १९,२००/ रुपयांच्या २४० बाटल्या, ५,५०,०००/- रुपयांची एक पांढऱ्या रंगाचे महीद्रा मॅक्स पिकअप क्र. एम एच २५ -पी - ०२०९, तसेच ४,००,०००/- रुपयांची स्विफ्ट डिझायर कार क्र एम एच-४६-एडी-५६०३ असा मुद्देमाल व वाहन जप्त करीत मोठी धाडसी कारवाई मध्यरात्री गुरुवार रोजी पहाटे २ च्या सुमारास बाय-पास चौक अंबाजोगाई रोडवरकेली. या कारवाईत दत्तात्रय भिकाजी वाघमारे (वय ४४ रा. रत्नापुर, जि. उस्मानाबाद), व्यकटेश नागनाथ गंजेवार (वय २२ रा.मंगळवार पेठ, अंबाजोगाई), रोहन राजाभाऊ जाधव (वय २२ रा. भगवान बाबा चौक अंबाजोगाई) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.मध्यरात्री करण्यात आलेली ही कारवाई सपोनि भार्गव सपकाळ, सपोनि गोस्वामी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, घटमल, पोना. लोहबंदे, पांचाळ, प्रल्हाद भताने यांनी केली असून या प्रकरणी ठाण्याचे कर्मचारी प्रल्हाद भताने यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम ४२०, ३४ भादवि सहकलम ६५ ई म. प्रो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा