Subscribe Us

header ads

दारूच्या नशेत नेहमी आईला त्रास देणाऱ्या पित्याचा मुलाने धारदार कोयत्याने केला खून

बीड स्पीड न्यूज 

दारूच्या नशेत नेहमी आईला त्रास देणाऱ्या पित्याचा मुलाने धारदार कोयत्याने केला खून


केज|प्रतिनिधी-: दारूच्या नशेत नेहमी आईला त्रास देणाऱ्या पित्याचा मुलाने धारदार कोयत्याने तोंडावर व हातावर वार करत खून केला. त्यानंतर सोयाबीनच्या भुसकटात मृतदेह पुरून ठेवला. केज तालुक्यातील साळेगाव शिवारात १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली. युसूफवडगाव पोलिसांत जाऊन त्याने स्वत:च याची माहिती दिली. शिवाजी केशव हंकारे (५३, रा. जवळबन ता. केज ) असे खून झालेल्या पित्याचे तर पवनकुमार हंकारे (२७) असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे.शिवाजी यांना पत्नी, दोन मुले, तीन मुली असून दोन मुलीचा विवाह झालेला आहे. त्यांचा मोठा मुलगा पवनकुमार हा पुण्याला कामाला असतो. त्याचाही विवाह झालेला आहे. त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे. शिवाजी यांना दारूचे व्यसन होते. ते सतत आई व इतर कुटुंबीयांना त्रास देत होते. चार दिवसांपूर्वी दारूच्या नशेत शिवाजी पत्नीला मारत होते. शेजाऱ्यांनी भांडण सोडवले. त्यानंतर पत्नी धाकटा मुलगा व मुलीला घेऊन तांबवा येथील भावाकडे गेल्या. त्यानंतर पवनकुमारने वडिलांना फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला. पण उलट त्यालाच शिवीगाळ केल्याने तो १४ जूनला पहाटे पुण्याहून गावी आला. दुपारी वडिलांना साळेगाव शिवारातील सदाशिव पारखे यांच्या शेतात निर्मनुष्य ठिकाणी आणले. तेथे कोयत्याने वार करत खून केला.केजचे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, एपीआय शंकर वाघमोडे, फौजदार राजेश पाटील, वैभव सारंग, जमादार उमेश आघाव, पोलिस नाईक अशोक नामदास, संतोष गित्ते, बाळासाहेब अंहकारे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पवनकुमारने वडिलांचा मृतदेह सोयाबीनच्या भूसकटातून काढून दाखवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा