Subscribe Us

header ads

सरस्वती विद्यामंदिर शाळेत प्रवेशोत्सव

बीड स्पीड न्यूज 


सरस्वती विद्यामंदिर शाळेत प्रवेशोत्सव    

बीड / प्रतिनिधी-: शाळेचा पहिला दिवस असल्याने सरस्वती विद्या मंदिर शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी संस्थेचे सचिव व  शिक्षक नेते उत्तम पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचा संच व  पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे  स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पवार सर म्हणाले की गेल्या दोन वर्षात करुणा महामारी च्या प्रादुर्भावामुळे जेमतेम दोन तीन महिने शाळा भरली होती. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासापासून दुरावले गेले, तुम्हाला आता फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पोकळी भरून काढण्यासाठी शिक्षकांनी वेळप्रसंगी जादा तास घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी सूचनाही त्यांनी शिक्षकांना केली . विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकवृंदानी शाळेचा संपूर्ण परिसर विविध रंगाच्या रांगोळीतील कलाकुसरीने सजवला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा