Subscribe Us

header ads

महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्याची केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी: - दत्ता पाटील जाधव.

बीड स्पीड न्यूज 


नांदेड जिल्हा ,प्रतिनिधी प्रकाश कारलेकर 

महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्याची केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी: - दत्ता पाटील जाधव.




उमरी :- दि.20 महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्याची केलेली दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी  यासाठी भारतीय  जनता  पार्टी युवा तालुका उमरी सरचिटणीस दत्ता पाटील जाधव तळेगावकर  यांच्या मार्फत तहसीलदार यांना देण्यात आलं निवेदन.महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असलेल्या चालू खरीप हंगामामध्ये महाबीज कंपनीने सोयाबीन बियानाची 30% दरवाढ केली असून, त्यात मागीलवर्षीपेक्षा बियाणांच्या भावामध्ये मोठी वाढ झाली असून महाबीज कंपनीने हि दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी व सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस दत्ता पाटील जाधव तळेगावकर यांनी केली आहे.यावर्षी शासनाचा महाबीज कंपनीने बियाण्याची दरवाढ केल्यामुळे खाजगी कंपन्यांनी देखिल सोयाबिन बियाण्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ केली आहे, गेल्या वर्षात बियाण्याचे दर स्थिर होते परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बियांनाच्या किमतीत 30% दरवाढ झाली आहे, पेरणीच्या तोंडावर मोठी दरवाढ झाल्यामुळे मोठा आर्थिक बोजा सोयाबिन उत्पादक शेतकरी बांधवांना पडणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडनार असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महाबीजला बियाण्यांची दरवाढ तात्काळ मागे घेण्याचं सांगून शेतकर्‍यांना दिलासा देण्याच काम कराव अशी आग्रही मागणी देखील कृषीमंत्री दादा भुसे यांना उमरी तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात दत्ता पाटील जाधव यांनी केली आहे. यावेळी गोविंद पाटील ढगे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा