Subscribe Us

header ads

बीड जिल्हा सहजयोग युवा शक्तीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन,धारवंटा जि.प.शाळेत योग दिन

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा सहजयोग युवा शक्तीच्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन,धारवंटा जि.प.शाळेत योग दिन


बीड (प्रतिनिधी): बीड जिल्हा सहजयोग परिवार युवा शक्तीच्या वतीने बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात योग दिनानिमित्त सहजयोग साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्राचार्य,प्राध्यापक,विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर गेवराई तालुक्यातील धारवंटा येथे जिल्हा परिषद शाळेत योग दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला.
बीड जिल्हा सहजयोग परिवार या युवाशक्ती टीमच्या माध्यमातून श्री माताजी निर्मला देवी यांच्या परम कृपे मध्ये मध्ये मंगळवार दि.२१ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 

सहजयोगाचे महत्व सांगण्यात आले. यामध्ये जवळपास ९० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच उपस्थित प्राध्यापक,९० विद्यार्थी यांना कुंडलिनी जागृती 
अनुभूती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त झाला. तंत्रनिकेतन कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्रोफेसर यांना सहज योग वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध असून ,आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सहज योग याचा कसा लाभ घेता येईल याबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी मराठवाडा युवा शक्ती कॉर्डिनेटर डॉ.ज्योती सूर्यवंशी ,डॉ.आरती काकडे, युवा शक्ती जिल्हा कॉर्डिनेटर  सचिन शेळके, श्री रवि वाघमारे ,सुमित वंजारे यांची उपस्थिती होती.त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारवंटा या ठिकाणी योग दिनानिमित्त सहज योग कुंडलिनी जागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला.यामध्ये प्रामुख्याने अर्जुन खोपडे, श्री.उदावंत,बाळासाहेब शेळके,गोदावरी शेळके,दयानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा