Subscribe Us

header ads

मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगसाधना आवश्यक– जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड स्पीड न्यूज 



मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी योगसाधना आवश्यक– जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

 

बीड येथे "आंतरराष्ट्रीय योग दिनसाजरा

    

 

बीड|प्रतिनिधी-:  दि. 21 (जि. मा. का.) : प्रत्येकाने दररोज योगासने केल्यास मानसिक व शारीरिक स्वास्थ लाभेल. त्यामुळे प्रत्येकाने रोज एक तास योगसाधना करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत 

होते.जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, भारताने जगाला योग दिनाची देणगी दिली आहे. 2016 मध्ये जागतिक स्तरावर योग दिनाची सुरुवात झाली. यावर्षी आठवा योग दिन असून, या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य योगा फॉर ह्युमॅनिटी (मानवतेसाठी 

योग) असे आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे, शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योग ही एक गुरु किल्ली आहे, असे स्पष्ट करून त्यांनी उपस्थितांना योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर जिल्हा योग संघटनेच्या मदतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मदतीने 

जिल्हा क्रीडा  संकुल, बीड येथे योगा प्रशिक्षण  केंद्र सुरु करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा योग असोसिएशनचे योगगुरू विनायक वझे आणि विकास गवते यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, 

अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, बीड  नगरपरिषद मुख्याधिकारी उमेश ढाकणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, झुंबडलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी 

देशमुख, धनेश करांडे आदि मान्यवरांसह नागरिक, विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून योगासने प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग घेतला.या प्रसंगी प्रत्येक आसनाचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येक प्रकाराचे प्रात्यक्षिक करून योग गुरु यांनी उपस्थितांना प्रातिनिधिक स्वरूपात योगासने करावयास 

सांगितले. यामध्ये विविध योगासनांचे सद्यस्थितीत असलेले महत्त्व देखील समजावून सांगितलेत्याच बरोबर वज्रासन त्यातील विविध प्रकार तसेच दंडासनभद्रासन आदि विविध प्रकारची योगासने करत उपस्थितांनी योग अभ्यास केलायोग अभ्यासाचा शेवट प्रार्थना पठनाने झाला.या वेळी राष्ट्रीय खेळाडू रचना कोटोळे व राष्ट्रीय 

योग पंच  प्रवीणा वाघमारेü यांचा सत्कार  जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. पुष्करणी वझेê या राष्ट़ीय योग खेळाडूचा सत्कार पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरü यांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा प्रशासनजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय व जिल्हाक्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी वाजता झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक सुहासिनी देशमुख यांनी तर नागनाथ शिंदे यांनी आभार मानले.दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या वर्षी साजरा होत आहेया अनुषंगाने बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक