Subscribe Us

header ads

उमरद खालसा येथील सेवा सोसायटी शिवसंग्राम च्या ताब्यात

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी  नवनाथ गोरे

उमरद खालसा येथील सेवा सोसायटी शिवसंग्राम च्या ताब्यात



वाकनाथपुर प्रतिनिधी-:बीड तालुक्यातील मौजे उमरद खालसा येथील सेवा सोसायटी गेल्या पंचवीस वर्षा पासून शिवसंग्राम च्या ताब्यात आहे. गेले अनेक वर्ष झाले उमरद खालसा येथे राहणारे श्री शिवाजी परस्कर हे बिनविरोध निवडून येत होते. पण या वर्षी येथे मतदान घेण्यात आले आणि परत शिवाजी परस्कार यांचे बारा पैकी बारा उमेदवार निवडून आले. आणि परत एकदा उमरद खालसा येथील सेवा सोसायटी शिवसंग्राम च्या ताब्यात गेली निवड होताच सर्व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या मध्ये शिवाजी परस्कर, नागोराव जाधव, गणेश जाधव नवनाथ जाधव, राम प्रभाळे, गोदावरी प्रभाळे, सविता परस्कर  ज्ञानोबा सोनवणे, छगन प्रभाळे, सुनील होलकर, मारुती कापसे, मदन जाधव, यांची निवड करण्यात आली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा