Subscribe Us

header ads

लक्ष्मीकांतजी यांना सोबत घेऊन नव्या जोमाने काम करू पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ.अरूण निरंतर यांची प्रतिपादन

बीड स्पीड न्यूज 


लक्ष्मीकांतजी यांना सोबत घेऊन नव्या जोमाने काम करू पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ.अरूण निरंतर यांची प्रतिपादन 

बीडमध्ये संवाद सभा उत्साहात,संचालक मंडळ, सभासद, खातेदार गुरूबंधुंची उपस्थीती 

प्रतिनिधी | बीड-: डॉ. लक्ष्मीकांतजी पारनेरकर आणि पूर्णवाद परिवार यांच्या सहभागाने पूर्णवादी  बँकेची या पुढील वाटचाल निश्चितच प्रगतीपथावर राहील , त्यांना सोबत घेऊनच नव्या जोमाने काम करू असे   प्रतिपादन  पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष  डॉ. अरुण  निरंतर यांनी केले.  तर डॉ. अरूणजी  निरंतर यांनी जी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी नक्कीच या पुढे  बँकेला वेळ देईल असे  शिवराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी केले.बीड शहरातील हॉटेल आन्वीता येथील  सभागृहात शुक्रवार १७ जुन २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजीत संवाद सभेच्या निमित्ताने ते बोलत होते .यावेळेस डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांना नुकतीच पीएचडी मिळाल्याबद्दल डॉ.अरुण निरंतर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सानप, सुहास तेंडूलकर ,बाळासाहेब बाहेगव्हाणकर ,विश्वनाथ माणूसमारे, अॅड.अमित देशपांडे, डॉ.किरण देशपांडे, जगदीश शिरापूरकर, जीवन कला मंडळाचे अशोक 

महाजन आदी उपस्थीत होते.पुढे बोलतांना डॉ निरंतर म्हणाले की,बँकेची स्थापना डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेतून झाली आणि आज महाराष्ट्रामध्ये ही बँक नावारूपाला आली आहे. या प्रगतीच्या टप्प्यांमध्ये बँकेचे माजी अध्यक्ष कै.डॉ. शरद वैद्य डॉ.जयंत  लवूळकर ,कै. ओमप्रकाश कलंत्री व सर्व संचालक मंडळींनी  खूप मेहनत घेतली. या बरोबरच  परमपूज्य महाराजांचे आशीर्वाद लाभले. त्या मुळे ही बँक आज एवढी प्रगती करू शकली असेही डॉ.  निरंतर यांनी सांगीतले. यावेळी डॉ  पारनेरकर यांनी बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि  बँकेसाठी कामात प्रत्यक्ष सहभाग  देण्याची ग्वाहीही दिली.यावेळी  बँकेचे सर्व संचालक मंडळ ,पूर्णवादी परिवारातील गुरुबंधू ,बीड शहरातील प्रतिष्ठित नागरिक , बँकेचे सभासद,उपस्थित होते सूत्रसंचालन जगदीश शिरापूरकर तर आभार अॅड.अमित देशपांडे यांनी मानले. या कार्यक्रमात पूर्णवादी परिवाराच्या वतीने बँकेचे अध्यक्ष डॉ. निरंतर, उपाध्यक्ष चंद्रकांत सानप यांचा सत्कार करण्यात आला.

विनंतीला मान देवुन मी नक्कीच या पुढे बँकेला वेळ देईल: डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर

परमपूज्य महाराजांच्या संकल्पनेतून मुंबई आणि इतर अनेक ठिकाणी ज्या अर्थशास्त्रविषयक पुरस्कार दिले जातात त्या पुरस्काराच्या माध्यमातून होणारा संपर्क आपल्या बँकेच्या कामी नक्कीच येईल आणि  डॉ. निरंतर यांनी जी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन मी नक्कीच बँकेला वेळ देईल.पूर्णवादाचे जे कार्य बीड शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध माध्यमातून होत आहे. त्यासाठी महाराजांनी या ग्रामीण भागांमध्येही बीजारोपण केलेले असुन आता त्याचा   मोठा वृक्ष झालेला आपण पाहत आहोत.असेही डॉ.लक्ष्मीकांत पारनेकर यांनी यावेळी  सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा