Subscribe Us

header ads

कुलकर्णी साहेब.. उद्या जीवित हानी झाली तर जबाबदार तुम्हाला की गुत्तेदाराला धरायचं ?

बीड स्पीड न्यूज 

कुलकर्णी साहेब.. उद्या जीवित हानी झाली तर जबाबदार तुम्हाला की गुत्तेदाराला धरायचं ?

चौसाळा — कुलकर्णी साहेब.. जनतेचे एवढं काम करा दोन वर्षापूर्वी सुलतानपूर व नांदूर रोड वरील पुलाच्या कामाच टेंडर मंजूर झालं. आतापर्यंत झोपा काढल्या पण सुरू असलेल्या या दोन्ही कामातील निकृष्ट पणामुळे उद्या जीवित हानी झाली तर याला जबाबदार तुम्हाला धरायचं की गुत्तेदार घोडके ला धरायचं हे एकदा स्पष्ट करा.चौसाळा नांदूर राज्य महामार्गावरी लेंडी नाल्यावर 88 लक्ष रुपये किमतीच्या पुलाचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मात्र पावसाळा सुरू झाला तरी हे काम अद्याप पूर्ण झालच नाही. या कामाच्या टेंडरला दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. गुत्तेदाराने जुन्या पुलाच्या सिमेंट नळ्या काढून पर्यायी रस्त्यासाठी वापरल्या. हे काम देखील थातूरमातूर केल्यामुळे एकाच पावसात पर्यायी रस्ता खचला तीन-चार दिवस या महामार्गावर ची वाहतूक खोळंबली. सध्या पूलाच्या बांधकामासाठी लोखंडी ताराचा वापर केला की गजाचा हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहा एमएम पेक्षा मोठा गज वापरला गेला नाही. स्टील डिझाईन तयार केलं गेलं नाही. नुसते जग दाक्षायणी लोखंडाचा वापर केला आहे यासाठी नुसते गज पिलर मध्ये खोचले आहेत. पुलाच्या बांधकामासाठी सिमेंटच प्रमाण देखील अत्यल्प वापरला आहे. मग असा निकृष्ट दर्जाचा पूल कुठपर्यंत टिकणार? जवळपास हीच स्थिती सुलतानपूर रोडवर घोडके नावाच्या गुत्तेदारानेच केलेल्या पुलाबाबत घडली आहे. दोन कोटी 25 लाख रुपयांची ही दोन्ही काम आहेत. हा पूल सध्या रहदारीला खुला झाला असला तरी बोगस कामामुळे तो किती दिवस टिकेल हे सांगणं अवघड आहे.बोगस काम करून जनतेच्या जिवाशी अधिकारी व गुत्तेदाराचा हा खेळ नव्हे काय? सार्वजनिक बांधकाम विभाग नुसतं झोपा काढत आहे की काय?आपल्यासारखे अभियंते मिंध्ये असल्यासारखी धृतराष्ट्रा सारखी भूमिका का घेत आहेत? भविष्यात या निकृष्ट पुलामुळे जीवित हानी झाली तर याला जबाबदार कुलकर्णी साहेब तुम्हाला धरायचं की गुत्तेदाराला धरायचं हे एकदा स्पष्ट कराच!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा