Subscribe Us

header ads

शिवसेनेचे जाळेमुळे अजून घट्ट करणार - बाबासाहेब सराफ

बीड स्पीड न्यूज 



शिवसेनेचे जाळेमुळे अजून घट्ट करणार - बाबासाहेब सराफ



किल्ले धारूर प्रतिनिधी: शिवसेना पक्षाचे व राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेने सोबत बंडखोरी केली आहे.ते गेले तरी शिवसेने साठी रात्रीचा दिवस आणि दिवसांची रात्र करून शिवसेनेची जाळेमुळे अजून घट्ट करणार असलेचे शिवसेना तालूका सचिव बाबासाहेब सराफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.बाबासाहेब सराफ यांनी बोलले की, हा हिंदू हृदयसम्राट श्रद्धेय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राजकारभार उत्तमरीत्या चालवीत असतांना विरोधकांनी डाव साधून सत्तेला आच आणण्याचा  प्रयत्न करीत आहेत. सत्ता परिवर्तन हे या निसर्ग नियम असून सत्ता आज आहे. उद्या नाही. पण शिवसेनेचे संघटन व प्राबल्य राज्यात अजून वाढणार व असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला अजून बहर येणार असल्याचे ठाम विश्वास बाबासाहेब सराफ यांनी व्यक्त केले.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शना खाली श्रद्धेय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व मुख्यतः शिवसेनेची कार्यप्रणाली सदोदित व अविरत  सुरू ठेवणार असून नवी उभारी घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो असल्याचे मत बाबासाहेब सराफ यांनी व्यक्त केले आहे. खरे तर शिवसेनेत आमदार, खासदार, मंत्री काही कालावधी पर्यंत अर्थात क्षणिक असतात. पण शिवसैनिक आजन्म असतात आम्ही शिवसेनेचे पाईक असून शिवसैनिक म्हणून सदैव पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सोबत खंबीरपणे पाठीशी राहणार असून पक्षात सर्व काही व्यवस्थित सुरू असताना स्वाथापोटी काहींनी बंड पुकारून राज्याबाहेर गेल्याने आमदार, खासदार,मंत्र्यांचा निषेध प्रसिध्दी पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा