Subscribe Us

header ads

ट्विनकलिंग स्टार शाळेच्या विद्यार्थांचे यश

बीड स्पीड न्यूज 


ट्विनकलिंग स्टार शाळेच्या  विद्यार्थांचे यश

बीड|प्रतिनिधी-: टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन , इंडिया अंतर्गत घेण्यात येणाऱ्या  क्रीडा महोत्सवात ,ट्विनकलिंग स्टार" शाळेच्या इ. सातवीत शिकणाऱ्या  यशवंत गणेश राठोड , अर्जुन विजय दहिफळे, अथर्व अर्जुन बांगर ,योगेश्वर लालाजी जाधव या विद्यार्थांनी  जालना इथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकत राष्ट्रीय 

स्तरावर , चेन्नई इथे खेळण्यात  येणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी कमावली आहे.यावेळी पालकमंत्री राजेंद्र तुपे यांच्या हस्ते सर्व पारितोषिक मिळवण्याचा मान प्राप्त केला आहे. ट्विनकलिंग स्टार स्कूलचे प्राचार्य दीपक कुमार झा , स्कूल डायरेक्टर कोमाथ भास्करण आणि संचालक गणेश मेड यांनी विद्यार्थांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले .
यासाठी त्यांचे शाळेसह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा