Subscribe Us

header ads

माजी मुख्यमंत्री वसंरावजी नाईक यांचा जयंती निमित्त सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अशोक बाबुराव पवार यांनी केले

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे

माजी मुख्यमंत्री वसंरावजी नाईक यांचा जयंती निमित्त सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अशोक बाबुराव पवार यांनी केले



वाकनाथपुर प्रतिनिधी-: प्रत्येक वर्षी माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांची जयंती अनेक ठिकाणीं साजरी होते माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांना शेतकऱ्यांची खुप जान होती. संकटाच्या वेळी वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना ते मदत करत होते. म्हणून त्यांना कृषी तज्ञ प्रगतशील शेतकरी व राजनीतिज्ञ म्हणुन ओळखले जायचे वसंतरावजी नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पदभार सांभाळला वसंतरावजी नाईक यांना हरितयोद्धा म्हणुन देखील संबोधले जायचे वसंतरावजी नाईक यांची जयंती दोन दिवसावर आली आहे.दिनांक १ जुलै वार शुक्रवार रोजी अंतरवन पिंप्री तांडा येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या वेळी अध्यक्ष अशोक बाबुराव पवार आणि गावकऱ्यांनी शुक्रवार रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत अन्नदान करण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच शाळेतील काही गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करून शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहेत. तरी माजी मुख्यमंत्री वसंतराव जी नाईक यांच्या जयंतीला पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष अशोक बाबुराव पवार,पांडुरंग पवार, सरपंच रामभाऊ पवार,कृष्णा राठोड, विशाल पवार, राहुल पवार, लहू पवार, शिवाजी पवार, संदिप पवार, दिलीप राठोड, स्वप्नील पवार, मिथून राठोड, आणि सुशील भाऊ पवार मित्र मंडळ यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा