Subscribe Us

header ads

वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई च्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेल्या बोगस दुहेरी मतदान यादीतील नावे तत्काळ रद्द करा

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी:-शेख फेरोज

वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई च्या वतीने प्रभाग क्रमांक 15 मध्ये असलेल्या बोगस दुहेरी मतदान यादीतील नावे तत्काळ रद्द करा मा मुख्याधिकारी मार्फत निवडणुक आयोगास निवेदन

अंबाजोगाई प्रतिनिधी:-: दिनांक-३०/११/२०२१ व,दिनांक-21/01/2022 चे आपल्या निवडणूक विभागास पत्र. देण्यात आले आहे. त्यामध्ये वंचित ने निवेदनात म्हटले आहे की,साध्य संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नगर परिषद व नगर पंचायत,महानगर पालिका पंचवार्षिक निवडणूक येत्या काही महिन्यात होऊ घातल्या आहेत.त्या द्रष्टीकोनातून आपण 21/06/2022रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे.याच वेळेस आपल्या निवडणूक विभागाने आदेश जरी करून सांगितले आहे कि.27/06/2202 पर्यंत नवीन नाव नोंदणी,नाव वगळणे,स्थलांतर करणे,व मतदारांची असणारी दुबार नावे वगळणे व आक्षेप घेणे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.तसेच अंतिम मतदार यादी आपण दिनांक ०१/०७/२०२२रोजी प्रसिद्धकरणार आहोत.तरी अंबाजोगाई नगर परिषद प्रभाग क्रमांक 15 च्या प्रारूप मतदार यादीमध्ये मयत नावे,परगावी स्थलांतरीत झालेल्या व त्याच ठिकाणी कायमच्या वास्तव्यास असलेल्या मतदारांची नावे नोंद आहेत.तसेच डबल- डबल ग्रामीण भागात व दोन-दोन विधानसभा मतदार संघात नोंद असलेल्या मतदारांची नावे.परजील्यातील मतदारांची नावे.अंबाजोगाई शहरातून स्थलांतरीत झालेल्या/बदली झालेली पोलीस कर्मचारी वसाहतीतील नावे,प्रभागच्या हद्दीत वास्तव्यास नसलेली व प्रस्तापित सत्तेतील पुढारी/नेते यांनी आपल्या सोयीचे म्हणून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी नोंद करून घेतलेली दुबार नावे नोंद आहेत. हि नावे अंबाजोगाई शहरात जवळपास ४ ते ५ हजार असण्याची शक्याता आहे.हि शासनाची व जनतेची फसवणूक आहे.मुळात निवडणूक प्रारूप यादी जाहीर झाल्यास आपल्या निवडणूक अधिकारी तहसील कार्यालय अंबाजोगाई यांनी बैठक घेऊन सूचना देणे आवश्यक होते.परंतु आपल्या अंबाजोगाई तहसील निवडणुक अधिकारी साहेबांनी हि निवडणूक संदर्भाची सर्वपक्षीय बैठक दिनांक १२/११/२०२१ रोजी आयोजित केली.या वेळेस वरील प्रमाणे आपल्या निवडणूक आदेशाची सर्व माहिती दिली गेली.परंतु अंबाजोगाई शहरात व विशेषता प्रभाग क्रमांक 15 मध्ये असणारी बोगस दुबार नोंद असलेली,स्थलांतरीत मतदाराची जवळपास हि नावे ९६८ आहेत. अंबाजोगाई शहरात ४ ते ५ हजार असण्याची शक्याता आहे. हि नावे वळण्याची जबाबदरी आपल्या निवडणूक विभागाणे घेतली नाही.मतदार नाव नोंद करून घेणे हि आपली जबाबदारी आहे.मग दुबार नोंद असलेली, बोगस स्थलांतरीत,मयत मतदाराची नावे वळण्याची जबाबदरी कोणाची आहे.हा प्रश्न आम्हाला अनुउत्तरीत आहे.हि नावे न वगळण्या मागे कोणते महत्वाचे कारण आहे.हि नवे आपण का वगळीत नाहीत.तरी या निवेदनाद्वारे आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करत आहोत कि संबंधीत बोगस स्थलांतरीत,मयत,प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असलेल्या मतदारबाबत आपणास निवेदन देण्यात आले होते.परंतु आपण त्या निवेदनाच्या बाबतीत कुठलीही कार्यवाही केली नसल्याने व त्या नावाची पडताळणी करून बाद केले नसल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे.या बाबतीत आपण आम्हाला पुरावे सदर करा म्हणता.परंतु आम्हाला उपलब्द झालेली सर्व माहिती व पुरावे हे अल्प प्रमाणात आहेत.मुळात हि जबाबदारी आपली आहे. अंबाजोगाई शहरातील प्रभाग 15 मधील मतदाराची नावे वगळूनच अंतिम मतदार यादी व व शहराची अंतिम प्रभाग रचना जाहीर करून पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडावी.याच प्रकारे पूर्ण अंबाजोगाई शहरात हजारो नावे हि बोगस स्थलांतरीत,मयत,प्रभागाच्या बाहेर वास्तव्यास असलेली आहेत.याची आपण सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती.. या निवेदद्वारे करण्यात आली आहे. या वेळेस  वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष गोविंद मस्के, शहर महासचिव नितीन सरवदे, वंचित चे प्रवीण मिसळ, धर्मराज चौरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा