Subscribe Us

header ads

शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवार अंबाजोगाई च्या वतीने नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद यांचा सत्कार संपन्न

बीड स्पीड न्यूज 


अंबाजोगाई प्रतिनिधी  शेख फेरोज 7020475287
 
 शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवार अंबाजोगाई च्या वतीने नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद यांचा सत्कार संपन्न

अंबाजोगाई|प्रतिनिधी-:अंबाजोगाई तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदी नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद साहेब यांचा शिक्षक मैत्री प्रतिष्ठान परिवार अंबाजोगाई तर्फे एका छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी व्यासपीठावर गटशिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्री शिवाजीराव रोडे प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू बाप्पा सरवदे सदस्य 

नगरसेवक श्री सुनील व्यवहारे विषय तज्ञ श्री प्रकाश शिंदे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयदादा रापतवार उपस्थित होते.यावेळी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय दादा रापतवार यांनी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी श्री शेख चांद साहेब यांच्या सत्कारा मागील प्रतिष्ठान ची भूमिका स्पष्ट केली व श्री शेख साहेब यांनी तालुक्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याची व शिक्षकांचे कार्यालयीन पातळीवर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली व शिक्षक मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने आज पर्यंत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली तसेच शिक्षकांच्या बाबतीत काही चुकीचे घडले अथवा अन्याय होईल त्याठिकाणी प्रतिष्ठान ठामपणे शिक्षकाच्या मागे उभे राहील व प्रतिष्ठान गटशिक्षण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यापुढेही विविध उपक्रमात सहभागी राहील 

अशी ग्वाही दिली यावेळी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक विष्णू बप्पा सरवदे यांनी बोलताना अंबाजोगाई तालुक्याला बऱ्याच वर्षानंतर पदाची गटशिक्षणाधिकारी लाभले व ते अत्यंत तरुण असल्याने त्यांच्याकडून अतिशय चांगली कामगिरी होईल असा विश्वास दर्शविला यावेळी सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी श्री शेख साहेब यांनी सांगितले की अशा पद्धतीने नवनियुक्त अधिकाऱ्यांचा सत्कार करणे म्हणजे एक वेगळ्या प्रकारे अधिकारी व शिक्षकांना बॉण्डिंग तयार होते व ओळख होते जेणेकरून विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांची मदत होते त्याबद्दल या सत्कारासाठी 

प्रतिष्ठानचे आभार मानले व यापुढे अंबाजोगाई तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी व शैक्षणिक कार्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी शिक्षक मैत्री प्रतिष्ठान च्या वतीने सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली शेवटी प्रतिष्ठानचे सचिव श्री उमेश नाईक यांनी सर्वांचे आभार मानले सदरील कार्यक्रमास शिक्षक माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अनुरथ बांडे सदस्य श्री जगन्नाथ वरपे विनायक चव्हाण संदीप दरवेशवार साधू गायकवाड पांडुरंग नरवडे संत तुकाराम महाराज बचत गट अध्यक्ष बाळासाहेब माने राजीव पटेल मोरोपंत कुलकर्णी समाधान धीवार श्रीनिवास मोरे शेख इरफान शेख आरिफ सुनिल पवार श्री धारेकर सर उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक