Subscribe Us

header ads

एक हजारांची लाच मागणाऱ्या भूकरमापकावर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 


एक हजारांची लाच मागणाऱ्या भूकरमापकावर गुन्हा दाखल

गेवराई-: प्लाटची मोजणी करून हद्द कायम करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागणारा गेवराई भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेने गुरुवारी (दि.२३) गुन्हा नोंदवला.तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता, आरोपी भूकरमापक शेख अब्दुल अतिख यांने सदरच्या प्लॉटची मोजणी मार्च 2022 मध्ये करून हद्द कायम करून दिली केलेल्या कामाकरिता 17 जून 2022 रोजी दोन मजुरांची मजुरी प्रत्येकी 500 रुपये असे 1000 रुपये लाचेची मागणी केली. एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसिबीचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस, पोलीस अमलदार भरत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक