Subscribe Us

header ads

मामाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह्य पोस्ट; पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर गुन्हा दाखल

बीड स्पीड न्यूज 



मामाबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह्य पोस्ट; पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर गुन्हा दाखल 

बीड|प्रतिनिधी-: पत्नीचे नावाने फेसबुक अकाऊन्ट बनवून पतीने त्यावर तिच्या मामाबद्दल बदनामीकारक पोस्ट केली. याबाबत माहिती मिळताच पत्नीने बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पती विरोधात गुन्हा नोंदवला.हेमंत रंगनाथ शिंदे (रा. काळेवडी, पुणे) असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी दिक्षा ( ह.मु. सारनाथ कॉलनी, शाहू नगर, बीड) यांच्या फिर्यादीनुसार, दहा वर्षापूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. परंतु, २०१८ पासून पती-पत्नीचा न्यायालयात वाद सुरु आहे. बुधवारी (दि. २२) हेमंतने दिक्षाच्या नावाने नवे फेसबुक अकाऊन्ट तयार केले आणि त्यावरून तिचे मामा गौतमराव नारायणराव चोपडे यांचा बदनामीकारक फोटो पोस्ट करून त्यावर आक्षेपार्ह्य लिखाण करून हे कृत्य केले. दिक्षा यांनीच केल्याचे दर्शविले. सदर फिर्यादीवरून हेमंत शिंदे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक