Subscribe Us

header ads

गुत्तेदराच्या हलगर्जी पणाने वाकनाथपुर येथील नागरिकांचे हाल

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

गुत्तेदराच्या हलगर्जी पणाने वाकनाथपुर येथील नागरिकांचे हाल




वाकनाथपुर|प्रतिनिधी-: बीड तालुक्यातील ग्रामीण भागात कोणत्या ही विकास होत नाही काही गावांना डांबरी रोड नाही आणि ज्या गावात डांबरी रोड होते त्या रोड वरती डांबर राहिले नाही. कोणतेही लोक प्रतिनिधी या कडे लक्ष देत नाही बीड तालुक्यातील मौजे वाकनाथपुर येथे आता पर्यंत कोणत्याही बाजूने डांबरी रस्ता नाही या गावातील नागरिक आतापर्यंत खुप हाल सहन करत आहेत. आता कोठे तरी तीन वर्ष पूर्वी या गावाला वाकनाथपुर ते म्हाळस जवळा हा रस्ता गेले तीन 

वर्ष पासुन मंजूर झालेला आहे. पण या रोड चे जे गुत्तेदार आहेत त्यांनी फक्त या रोड वर खडी आणि मुरुम टाकून काम बंद केले आहे. या गावातील नागरिकांनी अनेक वेळा गुत्तेदारांना सांगून देखील गुत्तेदार काही केल्या काम सुरू करत नाहीत. रोड वर मुरुम टाकल्याने पाऊस पडताच या रोड वर चिखल होतो. आणि या गावातील वाहने बाहेर ही निघत नाहीत या रस्त्यामुळे या गावातील नागरिकांना खुप ञास सहन करावा लागत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी यांनी या कामाची चौकशी करून योग्य कारवाही करून रोड चे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा