Subscribe Us

header ads

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणी पथकाची धडक कार्यवाही

बीड स्पीड न्यूज  

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंमलबजावणी पथकाची धडक कार्यवाही

 

बीड|प्रतिनिधी-: दि. 23 आज बीड शहरात डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक,बीड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायदा कोटपा - 2003 अंतर्गत उल्लंघन करणऱ्यांवर धडक कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जि.रु.बीड, अन्न व औषध प्रशासन,बीड, पोलीस प्रशासन व मराठवाडा ग्रामिण विकास संस्था, औरंगाबाद यांच्या संयुक्त पथका मार्फत करण्यात आली.सदरील कार्यवाही ही बीड शहरातील पंचशील नगर, पालवन चौक, धानोरा रोड, तुळजाई चौक, केएसके कॉलेज परिसर इ. ठिकाणच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्रावर धडक कार्यवाही करुन एकुण 17 विक्रेत्यांकडुन रु. 10800/- एवढा दंड वसुल करण्यात आला. तसेच त्यांना कोटपा कायदा-2003 विषयीची माहिती देऊन यापुढे कायदाचे उल्लंघन केल्यास कठोर कार्यवाहीचा इशारा पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आला.कोटपा कायद्या अंतर्गत शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्ड परिसरात कोणतेही तंबाखू विक्री केंद्र नसावे तसे आढळुन आल्यास शैक्षणिक संस्थेविरुध्द तसेच विक्रेत्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही केली जाते. तसेच विक्रेत्यांनी 18 वर्षाखालील मुलांकडुन तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे अथवा त्यांना विक्री करणे हे कायद्याने गुन्हा आहे तसा आशयाचा बोर्ड तंबाखू विक्री केंद्रावर लावणे बंधनकारक आहे.किराणा दुकानदारांनी कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास प्रतिबंध आहे. तसेच हॉटेल, लॉज, व सार्वजनीक आस्थपना यांना कोटपा कायद्यानुसार कलम 4 चा फलक लावणे बंधनकारक आहे. तसा फलक आढळुन न आल्यास अंमलबजावणी पथकामार्फत पुढील काळात कडक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये व खाजगी कार्यालये या ठिकाणी अंमलबजावणी पथकाची धडक कार्यवाही येत्या काही काळात संपुर्ण बीड जिल्ह्यात होणार आहे.सदरील अंमलबजावणी पथकामध्ये पोलीस प्रशासनाचे मारोती माने, पो.उपनिरीक्षक मंगेश घुले पो.कॉ., अन्न व औषध प्रशासनाचे महेंद्र गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी,  श्री. कांबळे, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जि.रु.बीडचे नागनाथ भडकुंबे, जिल्हा सल्लागार, सुरेश नारायण दामोधर सामाजीक कार्यकर्ता आणि मराठवाडा ग्रामिण विकास संस्था, औरंगाबाद चे विभागीय अधिकारी अभिजीत संघई इ. चे अधिकारी पदाधिकारी यांच्या समावेश असुन यांच्या मार्फत कार्यवाही करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा