Subscribe Us

header ads

उत्कृष्ट समाजसेवी अकरम भैय्या जरगर यांना "समाज सेवा पुरस्कार"

बीड स्पीड न्यूज 


उत्कृष्ट समाजसेवी अकरम भैय्या जरगर यांना "समाज सेवा पुरस्कार"

बीड प्रतिनिधी-:बीड येथील दैनिक दिव्य वार्ता च्या वतीने प्रसिध्द हॉटेल गोल्डन चॉईस येथे आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये धारूर तालुक्यातील तरुण तडफदार नेतृत्व अक्रम भैय्या जरगर यांना समाज सेवा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल "समाज सेवा पुरस्कार" मा.मौलाना शफीक कासमी साहेब  (इमामे खतीब ई. सी. डी. पी.  मिल्ट्रि मस्जिद अहेमदनगर), बीड जिल्ह्याचे खासदार डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे , मोहम्मद खान साहेब(प्रदेश अध्यक्ष रा.अल्पसंख्याक विभाग मुंबई) , मा.जयदत्त अण्णा क्षीरसागर  माजी मंत्री, माजी मंत्री मा. सुरेश नवले , मा.साहल चाउस साहेब एम आय एम जिल्हाध्यक्ष ॲड शेख शफीक भाऊ,, डॉ शोएब हाशमी,  यांच्या हस्ते देण्यात आला त्यावेळी दैनिक दिव्य वार्ता चे संपादक मोहम्मद अबूबकर चाउस साहब संपादक  पुरस्कार निवड समिती व इतर मान्यवर उपस्थितीतीत देण्यात आला. उत्कृष्ट समाजसेवी अकरम भैय्या जरगर यांना सदर प्रतिष्ठीत पुरस्काराने सन्मनित करण्यात आल्याबद्दल जिल्ह्यातील विवीध मान्यवर, मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा