Subscribe Us

header ads

बीड जिल्ह्यातील 1078 गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम हाती घ्या - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्ह्यातील 1078 गावांमधील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम हाती घ्या - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने  बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधील कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात बैठक

नव्याने 101 गावांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा योजना  राबविण्यात येणार; सौरऊर्जेचा होणार वापर

मोठ्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी एक्सप्रेस फिडर बसवण्यासाठी 10 कोटींचा निधी

परळी शहर व लागून असलेल्या गावांना 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणार, 5 कोटींचा निधी प्रस्तावित

5 व 7.5 एच पीच्या पंपांची जागा सोलर पंप घेणार; यासाठी 50 कोटींचा निधी -

मुंबई (दि. 01) - बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून सुमारे 1367 गावांमध्ये नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवण्याच्या योजनेची कामे हाती घेण्यात आली असून, 1078 गावांतील योजनांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातील ज्या कामांचा डीपीआर पूर्ण झाला आहे, त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ कामे सुरू करावीत व निर्धारित वेळेत कामे पूर्ण करावेत; असे निर्देश आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधितांना दिले आहेत. बीड जिल्ह्यातील जलजीवन मिशनमधून सुरू व प्रस्तावित कामांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीवरून ही बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. दोनच दिवसांपूर्वी बीड येथे जलजीवन मिशन मधील कामांचा धनंजय मुंडे यांनी बीड येथे आढावा घेतला होता; त्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाकडून आवश्यक सहकार्यासाठी मुंबई येथे बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले होते, त्यानुसार आजची बैठक पार पडली. या बैठकीस ना. गुलाबराव पाटील, ना. मुंडे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, आ. प्रकाश दादा सोळंके, आ. बाळासाहेब आजबे काका, आ. आ. संजय दौंड, यांच्यासह बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, एम जी पी चे मुख्य अभियंता यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यात जलजीवन मिशनचे काम जोरात सुरू असून, ज्या गावांमध्ये अद्याप कोणत्याही योजनेतून पाणी पुरवठा नाही, अशा सुमारे 101 गावांमध्ये सौर ऊर्जेसह पाणी पुरवठा योजना नव्याने मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बीड जिल्ह्यातील 50-60 मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या एक्सप्रेस फिडर साठी आवश्यक असलेला 10 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्याचे निर्देश श्री गुलाबराव पाटील यांनी विभागाला दिले आहेत.परळी शहर व आजूबाजूला लागून असलेल्या गावांना एकत्रित पाणी पुरवठा करून 24 तास पाणी उपलब्ध तरुण देण्यासाठी टोकवाडी येथे जलकुंभ उभारणीस 5 कोटी रुपये व अन्य आवश्यक कामांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजुरी साठी सादर करावा, असेही निर्देश धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांनी दिले. 
काही गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी 5 एच पी व 7.5 एचपी चे पंप बसवलेले आहेत; या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे सोलार पंप जोडणी करून विजेची बचत केली जावी, असे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुचवले होते. 5 व 7.5 एच पी च्या सोलार पंपांची मागणी दुरुस्ती करून डीपीआर करावेत व प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी 50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.  बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावोगाव-घरोघर पाणी पुरवठ्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेस आवश्यक सर्व सहकार्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच विभागाचे बीड जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा