Subscribe Us

header ads

प्रेषित मोहम्मद पैग़म्बर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मावर कार्यवाही करा लोकसेना

बीड स्पीड न्यूज 


प्रेषित मोहम्मद पैग़म्बर यांच्याबद्दल अपशब्द
वापरणाऱ्या भाजपा प्रवक्ता नूपुर शर्मावर कार्यवाही करा  लोकसेना

बीड प्रतिनिधि : दिनांक 27 मे रोजी भाजपा प्रवक्ता नूपुर शर्माने टाइम्स नाऊ टी व्ही चैनलच्या डिबेट मध्ये जगाला शांतीचा संदेश देणारे जगातील करोडो अरबो मुस्लिमांचे नबी प्रेरणास्थान असलेले हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहिवसल्लम यांच्या विषयी अपशब्दाचा वापर करुन तमाम देशवासियांच्या  व जगातील तमाम अनुयायीँच्या भावनेला ठेस पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भारत सरकारने आमचा राग व आमच्या भावना समजून नूपुर शर्मावर आय.पी.सी. कलम 153A, 153B, 295A, 298 आणि 505 नुसार गुन्हा दाखल करून  तात्काळ अटक करावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने लोकसेना पक्षाने शासनाला केलीली आहे. नसता जनआंदोलन उभारू असा इशारा शासनाला लोकसेना पक्षाने दिलेला आहे यावेळी लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार, खैसर बेग, जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, तालुकाध्यक्ष अतीख अहमद खान, शेख नदीम मेंबर, हारून बागवान, शेख अफफान, अबरार बागवान सय्यद इरफ़ान इत्यादि निवेदन देताना उपस्थित होते.

                                
                        
                 
      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा