Subscribe Us

header ads

आ.संदीप भैय्यांच्या अथक प्रयत्नांनी अंजनवती उपकेंद्र पुर्णत्वास; माजी मंत्री क्षीरसागरांचा फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न

बीड स्पीड न्यूज 


आ.संदीपभैय्यांच्या अथक प्रयत्नांनी अंजनवती उपकेंद्र पुर्णत्वास; माजी मंत्री क्षीरसागरांचा फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न



बीड (प्रतिनिधी):- तालुक्यातील अंजनवती  येथे उपकेंद्र व्हावे व परिसरातील गावांचा विजेचा गंभीर प्रश्न मार्गी लागावा यासाठी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी स्थानिक व मंत्रालयीन स्तरावर सतत्याने पाठपुरावा करून उपकेंद्रास मंजूरी मिळवून प्रश्न मार्गी लावला.आता या हे काम निवीदा प्रक्रियेपर्यंत पोहोचताच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याने येथील नागरिकांमधून रोष व्यक्त होताना दिसत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील अंजनवती येथे अंजनवती सह घारगाव,बोरखेड,वडवाडी आदी गावांसाठी ३३/११ केव्ही उपकेंद्र व्हावे अशी मागणी होती.ही गावे बीड मतदारसंघात असल्याने नागरीकांची मागणी व अडचण लक्षात घेत आ.संदीप भैय्या यांनी या विषयावर पाठपुरावा केला.पालकमंत्री, ऊर्जामंत्री, जागेसाठी महसूल विभाग आदींकडे बैठका घेतल्या.समोर येणाऱ्या अनेक अडचणींना तोंड देत अथक प्रयत्नानंतर हे काम मार्गी लावले.हे काम सध्या निविदा प्रक्रियेपर्यंत पोहचले असून पुर्णत्वास आले आहे.काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात येणार असल्याचेही आ.क्षीरसागर यांनी सांगितले आहे.पण यातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यामुळेच अंजनवती उपकेंद्राचे काम मार्गी लागल्याच्या मथळ्याखाली बातम्या प्रसिद्ध करून या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर करीत आहेत.यामुळे या भागातील लोक प्रचंड रोष व्यक्त करत आहेत.यासोबतच तुम्ही पालकमंत्री असताना हे काम का झाले नाही? इतक्या वर्षांपासून मागणी असताना आत्तापर्यंत दखल का घेतली नाही? तुम्ही सत्तेत असताना नाही,आणि सत्तेत नसताना मंत्रालयीन स्तरावरीर कामे कशी काय मार्गी लावता? असे विविध प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत.


या कामाच्या पाठपुराव्याचा एकही दस्तऐवज माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कडे असेल तर हे सर्व काम त्यांच्यामुळेच झाले असल्याचे आम्ही स्वतः जाहीर करू.पालकमंत्री असताना वारंवार मागणी करूनही त्यांनी दखल दिली नाही.संदीप भैय्या आमदार झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या स्तरावरील पाठपुरावा केला. या कामाच्या पुर्णत्वास केवळ आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्यामुळेच आले आहे.पण उघड-उघड दुसरर्‍यांनी केलेले काम मीच केले आहे असे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर सांगताना नवल वाटत आहे.

-सुनील येडे, (सरपंच, अंजनवती ग्रामपंचायत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा