Subscribe Us

header ads

महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न आता महसूल, पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाकडे !एल.एम.एम.ग्रुपच्या निवेदनाला मुख्यमंत्री कार्यालयाचे उत्तर

बीड स्पीड न्यूज 


महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न आता महसूल, पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाकडे !
एल.एम.एम.ग्रुपच्या निवेदनाला मुख्यमंत्री कार्यालयाचे उत्तर 



बीड (प्रतिनिधी) - शहरातील मोमीनपुरा भागात असलेल्या महेदवीया दायरा कब्रस्तान च्या जीर्णोद्धाराचा प्रश्न आता महसूल, पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाकडे सोपविण्यात आल्याचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाने एल.एम.एम.ग्रुपच्या निवेदनानंतर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांना दिले आहे. याविषयी सविस्तर असे की, बीड शहरातील मोमीनपुरा भागात मुस्लीम महेदवीया समाजाचे दायरा कब्रस्तान आहे. कब्रस्तानची दुरावस्था दुर करण्यासाठी कब्रस्तान ची विहीर, दर्गा आणि कब्रस्तानचे तात्काळ जीर्णोद्धार करण्याची मागणी एल.एम.एम.ग्रुप ग्लोबल चे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली होती.याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले होते की, काही वर्षांपूर्वी बीड शहरातील मोमीनपुरा बायपास रोडच्या बांधकामादरम्यान हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम रहेमतुल्ला अलैह यांची दर्गा असलेल्या मुस्लीम महेदवीया कब्रस्तान ची विहीर मोमीनपुरा बायपास रोड च्या निर्माणावेळी बीड नगरपरिषदेने बुजवून टाकली आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊनही महेदवीया कब्रस्तान ची विहीर अनेक वर्षे उलटून ही बीड नगर परिषद ने पुनरूज्जीवीत करून दिली नाही. यामुळे तेव्हापासून दर्गा शरीफ आणि दायरा कब्रस्तान परिसरात पाणी उपलब्ध नाही. हज़रत बंदगी मियाँ सय्यद शाह आलम बनी स्राईल फ़ानी फ़िल्ला बाक़ी बिल्ला रहेमतुल्ला अलैह यांचा दर्गा मुस्लीम महेदवीया समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. जगभरातून यात्रेकरू (ज़ायरीन) दर्गाह-ए-शरीफ़ला ज़ियारत (यात्रेसाठी) भेट देतात. याशिवाय बीड जिल्ह्यात आणि शहरात राहणारे मुस्लीम महेदवीया समुदाय कब्रस्तानचा वापर करतात.  बीड नगरपरिषदेने ही विहीर बुजविल्याने आणि मोमीनपुरा बायपास रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर ही विहीर पुनरूज्जीवीत न केल्याने यात्रेकरूंसह बीड जिल्ह्यात व शहरात राहणाऱ्या समाज बांधवांना दफनविधीच्या वेळी पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. तसेच दर्गा-ए-शरीफ आणि कब्रस्तानात वृक्षारोपण राखण्यासाठी  जमाअ्त-ए-महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी, बीड ने यापूर्वीही अनेकवेळा जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी यांना विहीर पुनरूज्जीवीत करण्यासाठी वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभाराने सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत. म्हणून महेदवीया दायरा कब्रस्तान ची विहीर पुनरूज्जीवीत करून देण्यासाठी व महेदवीया कब्रस्तान च्या जिर्णोध्दारासाठी या प्रकरणी संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी आदेशीत करावे व मुस्लीम महेदवीया समाजाची होत असलेली ससेहोलपट थांबवावी. अशी मागणी एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सय्यद अली दिलावर फ़र्रूख़ यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली होती. या निवेदनावर मुख्यमंत्री कार्यालयाने महेदवीया दायरा कब्रस्तानच्या जिर्णोध्दाराचा प्रश्न आता महसूल, पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाकडे सोपविल्याचे उत्तर दिले असल्याची माहिती मुक्त पत्रकार, एल.एम.एम. ग्रुप ग्लोबल चे बीड जिल्हाध्यक्ष तथा जमाअ्त ए महेदवीया दायरा कब्रस्तान कमेटी चे सचिव एस.एम.युसूफ़ यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविली असून लवकरच महेदवीया दायरा कब्रस्तान च्या जिर्णोध्दाराचा प्रश्न मार्गी लागेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा