Subscribe Us

header ads

शासकीय आरोग्य योजना रूग्णांसाठी लाभदायक

बीड स्पीड न्यूज 


शासकीय आरोग्य योजना रूग्णांसाठी लाभदायक

         

अनेक व्याधींनी ग्रस्त रूग्णांना तपासण्या व उपचारासाठी आर्थिक बाबींची जुळवाजुळव करणे जिकिरीचे जाते. मात्र शासकीय योजना अशा रूग्णांसाठी लाभदायक ठरताना दिसून येत आहेत.

बीड प्रतिनिधी-: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहेही योजनापूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती व दि.2 जुलै,2012 पासून आठ जिल्ह्यात लागू करण्यात आली होतीत्यांनतर दि.21 नोव्हेंबर, 2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्ह्यांमध्ये विस्तारीत करण्यात आलीया योजनेंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा  पुरविण्यात येत आहेत.

        आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाआयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि.23 सप्टेंबर,2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने सोबत एकत्रित रित्या सुरु करण्यात आलीही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणना, 2011 च्या यादीतील (SECC database) 83.63 लक्ष कुटुंबे यायोजनेची लाभार्थी आहेत.सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राज्यात दि. 1 एप्रिल 2020 रोजी पासून लागू करण्यात आली आहेकोविड-19 साथ रोगाच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि. 23 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी हमी तत्त्वावर विस्तारीत करण्यात आली आहेकोविड परिस्थिती विचारात घेऊन सदर विस्तारीत योजना दि.30 जून 2022 पर्यंत कार्यरत ठेवण्याकरिता शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला असून सेवा देण्यात येत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णतनिधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्यशासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.आजतागायत एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील रुग्णानी एकूण १३०९५६ उपचार / शस्त्रक्रियाचा लाभ मिळाला असून या उपचारासाठी रुपये २५३,४५,४८,१९४ रक्कमेच्या दावे मान्य करण्यात आले आहे.

लाभार्थी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थी गट अ - महाराष्ट्र राज्यातील  जिल्हयांमधील36 अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून वितरीत  करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिकाअंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाअन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍ शिधापत्रिकाधार कुटुंबे.  गट ब -  अवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबादजालनाबीडपरभणीहिंगोलीलातूरनांदेडउस्मानाबादअमरावतीअकोलाबुलढाणावाशिमयवतमाळ व वर्धाशुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे गट क शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती वजनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्यमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबेप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार अनुक्रमे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

       शहरी भागातील पुढीलप्रमाणे 11 व्यावसायिक गटातील कामगार योजनेसाठी पात्र आहेत. 1) कचरा वेचक, 2) भिक्षुक, 3) घरगुती कामगार, 4) गटई कामगारमोची /फेरीवालेरस्त्यावर सेवा पुरवणारे अन्य कामगार 5) बांधकाम कामगार, गवंडी, प्लंबर, रंगारी, हमाल व डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार, सुरक्षा रक्षक, वेल्डर 6) सफाईगाई माळी व स्वच्छक, 7) घरकाम करणारे, हस्तकला कारागिर, शिंपी, 8) वाहतूक कर्मचारीवाहकचालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा , वाहक, चालक, 9) दुकानात काम करणारे अटेण्डंट, मदतनीस, लहान आस्थापनांमधील शिपाई, सहाय्यक, वेटर, 10) वीजतंत्रीमेकॅनिकअसेम्ब्ली / दुरुस्ती करणारे 11) धोबी  वॉचमन

                     ग्रामीण भागाच्या एकूण 7 वंचित निकषांपैकीप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील कुटुंबांचा समावेश होतोD 1 -  कच्च्या भिंती  कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब, D2 - 16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे D 3 - 16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंबD4 दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे D5 - अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे, D7 -  भूमिहीन मजुराची कुटुंबेआपोआप समाविष्ट बेघरभिक्षुकस्वच्छता कर्म निराधार कुटुंब, मूलतअनुसूचित जमाती कायदेशीर बंधपत्रित कामगार

पात्रता आणि ओळख महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील  लाभार्थी : गट व पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. गट अ सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळखपिवळीकेशरीअंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व त्यासोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या फोटो ओळखपत्रांपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र याव्दारे पटविली जाते. गट ब - महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंबप्रमुखाचे नावअसलेल्या 7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसूल अधिकाऱ्यांनी लाभार्थीशेतकरी कुटुंबांतील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमूद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र याव्दारे निश्चित केली जाते.

गट क लाभार्थ्याची पात्रता कोणतेही शासनमान्य ओळखपत्रआरोग्यपत्रराज्य आरोग्य हमी सोसायटीने ठरविल्यानुसार निश्चित केली जातेदिनांक 23.05.20 पासून शुभ्र शिधापत्रिका धारकांना / शिधापत्रिका नसल्यास अधिवास प्रमाणपत्र / तहसीलदार दाखला सादर केल्यास महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या 996 उपचारांचा लाभ मिळू शकतो. 30.06.22 पर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव शासनास सादर केला असून सेवा देण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील लाभार्थी सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणना, 2011 मध्ये नोंदीत कुटुंबांतील सदस्य प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात संगणकीकृत ई-कार्ड व फोटो ओळखपत्र दाखवून लाभ घेऊ शकतातप्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत एका राज्यातील रुग्ण देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयांत जाऊन शस्त्रक्रिया/उपचारांचा लाभ घेऊ शकतो. सामाजिकआर्थिक व जातनिहाय जनगणना, 2011 मधील सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात एकूण 83 लाख, 72 हजार, 870 प्रधान मंत्री जनआरोग्य योजनेचे लाभार्थी असून त्यात ग्रामीण भागातील 58 लाख, 91 हजार, 282 कुटुंबांचा तर शहरी भागातील 24 लाख, 81 हजार, 588 कुटुंबांचा समावेश आहे. सन 2018 मध्ये राज्यात ग्रामीण व शहरी भागात ADCD (Additional Data Collection Drive) मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत ग्रामीण भागात ग्रामसभा तर शहरी भागात वार्ड सभा घेऊन लाभार्थींची यादी संबंधित ठिकाणी लावण्यात आली. त्यात उपलब्ध कुटुंबात नवीन जन्म किवा लग्न होऊन सून घरात आली असेल तर त्यांची नावे नव्याने टाकण्यात आली तर घरात मृत्यू झाले असल्यास किवा मुलगी लग्न होवून सासरी गेली असल्यास ती नावे वगळण्यात आली. या मोहिमेत 55 लाख, 66 हजार, 634 कुटुंबे आढळून आली असून त्यात ग्रामीण भागातील 45 लाख, 44 हजार, 491 तर शहरी भागातील 10 लाख, 22 हजार, 143 कुटुंबांचा समावेश आहे. एप्रिल 2022 अखेर 74 लाख, 52 हजार, 150 व्यक्तिंना आयुष्मान कार्डसचे वाटपकरण्यातआलेआहे.खालील ठिकाणी संस्थेमार्फत आयुष्मान कार्डस उपलब्ध होतात. आपले सरकार सेवा केंद्र, अंगीकृत रुग्णालये, UTIITSL (UTI Infrastructure Technology and Services Limited), Zephyr limited, Colorplast systems private limited.

वार्षिक विमा संरक्षण मर्यादा : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY): या योजनेंतर्गत एका पॉलिसी वर्षात लाभार्थ्यावर प्रतिकुटुंब रु. 1,50,000/- पर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाचा समावेश होतोमुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष रु.2,50,000/- इतकी वाढविण्यात आली आहे.

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB-PMJAY): या योजनेंतर्गत व्दितीय व तृतीय सेवेकरिता देशातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रतिकुटुंब प्रति  पॉलिसी वर्ष रु. 5 लक्षापर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येतेया योजनेचा लाभ देखील कुटुंबांतील एका किंवा सर्व सदस्यांना घेता येतो म्हणजेच रु. 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.

उपचारांचा समावेश :योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमध्ये पुढील निवडक 34 विशेष सेवा प्रकारांतर्गत झालेल्या शस्त्रक्रिया व चिकित्सावरील नि:शुल्क उपचारांचा समावेश आहेमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये 996 शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार आणि 121 शस्त्रक्रियापश्चात सेवांचा समावेश आहेतसेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत 1209 शस्त्रक्रिया/चिकित्सा/उपचार (.ज्यो.फु..योजनेतील 996 उपचार +अतिरिक्त 213 उपचारसमाविष्ट असून यामध्ये  183 (.ज्यो.फु..योजनेतील 121 सेवा + अतिरिक्त 62 सेवाशस्त्रक्रिया पश्चात सेवांचा (follow up packages) अंतर्भाव आहे.

विशेष सेवा प्रकार : जळीत, हृदयरोग, हृदयरोग शस्त्रक्रिया व उपचार, आकस्मिक सेवा, त्वचारोग, कान, नाक व घसा रोग, सर्वसाधारण शस्त्रक्रिया, संसर्गजन्य आजार, जठरांत्रमार्गाचे रोग, नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन, मज्जातंतूचे विकार, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, बालरोग कर्करोग, आस्कमिक वैद्यकीय उपचार, फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार, संधिवात संबंधीउपचार, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया, मानसिक आजार, अंत:स्त्राव संस्थेचे विकार, सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा, व्याधी चिकित्सा, इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी, कर्करोगावरील औषधोपचार, मुत्रपिंड विकार, मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया, नेत्ररोग शस्त्रक्रिया, बालरोग शस्त्रक्रिया, प्लास्टीक सर्जरी, कृत्रिम अवयव उपचार, किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा, जठर व आंत्रविकाराच्या शस्त्रक्रिया, मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया, जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया.अंगीकृत रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या दरामध्ये सर्वसाधारण वॉर्डमधील खाटाचे शुल्कपरिचारिका शुल्कविशेषज्ञभूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्कतपासणी शुल्कभुलऑक्सिजनऑपरेशन थिएटर व अतिदक्षता शुल्कशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची किंमतऔषधे व द्रव्येकृत्रिम अवयवाची किंमतरक्त संक्रमणाचे दर (राज्य शासनाच्या धोरणानुसार रक्त पुरविणे), इन्प्लॉटएक्स-रे व निदान चाचण्याआंतररुग्णास भोजनडिस्पोजेबल व कन्झुमेबलराज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या व्दितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतूक खर्च (रुग्णालय ते रुग्णाचे निवासापर्यंतया खर्चाचा समावेश आहेपॅकेज दरामध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपूर्ण खर्चाचा अंतर्भाव असून लाभार्थ्यास सर्व सेवा नि:शुल्क पुरवावयाची आहेजर रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृत देह रुग्णालयातून घरापर्यंत घेऊन जाण्याचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

राखीव उपचार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या 996 उपचारांपैकी 131 उपचार आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या 213 उपचारांपैकी 37 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालये, एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत सरकारी रुग्णालये, रुग्णालयाचे नाव व तालुका अनुक्रमे 

पुढीलप्रमाणे - वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र, अंबाजोगाई, स्वामी रामानंद महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई, ग्रामीण रुग्णालय, आष्टी, उपजिल्हा रुग्णालय केज, उपजिल्हा रुग्णालय गेवराई, स्त्री रुग्णालय नेकनू, उपजिल्हा रुग्णालय परळी, जिल्हा रुग्णालय बीड, ग्रामीण रुग्णालय माजलगाव.एकत्रित प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने अंतर्गत खाजगी रुग्णालये पुढीलप्रमाणे धुत हॉस्पिटल बीड, योगिता नर्सिंग होम व बालरुग्णालय केज, कराड हॉस्पिटल परळी, श्री संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल परळी, श्री सिध्दिविनायक नेत्रालय बीड, साबळे हॉस्पिटल माजलगाव, काकू नाना मेमोरियल हॉस्पिटल, बीड, घोळवे हॉस्पिटल, बीड, तिडके हॉस्पिटल, बीड, पॅराडाईज हॉस्पिटल, बीड, प्रशांत हॉस्पिटल, बीड, सानप बाल रुग्णालय, बीड, मातोश्री हॉस्पिटल, बीड, यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल, बीड, लाईफ लाईन मल्टीस्पेशलिटी, सर्जिकल हॉस्पिटल, बीड, विठाई हॉस्पिटल, बीड, वीर हॉस्पिटल, बीड, शुभदा हॉस्पिटल, बीड, सौ केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल, बीड, स्पंदन हॉस्पिटल, बीड, न्यू लाईफ स्त्री रुग्णालय, बीड, आणि आधार हॉस्पिटल गेवराई.

आजतागायत एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील रुग्णांना एकूण १ लाख ३० हजार ९५६ उपचार / शस्त्रक्रियांचा लाभ मिळाला असून या उपचारासाठी रुपये २५३,४५,४८,१९४ रकमेचे दावे मान्य करण्यात आले आहे.या योजनांचा लाभ घेण्यासाठी 24x7 कॉल सेंटरचा क्रमांक 155388 असून, संगणक संकेतांक 18002332200 आहे. तसेच www.jeevandayee.gov.in हे संकेतस्थळ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा