Subscribe Us

header ads

एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राज्यपालांची घेणार भेट

बीड स्पीड न्यूज 


एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, राज्यपालांची घेणार भेट

मुंबई-: महाराष्ट्रात आज होणारी फ्लोअर टेस्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर टळलेली आहे. यानंतर नव्याने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे गटाचा मुक्काम गोव्यात आहे. तर गटाचे नेते एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने सत्तास्थापनेच्या वाटाघाटींसाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे, भाजप नेतेही आज दुपारी 3 वाजता राजभवनावर जाणार आहेत.शिवसेनेचा गटनेता म्हणून ५० आमदारांनी माझी निवड केली आहे. मतदार संघातले काही प्रश्न होते. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊ या, अशी आमची मागणी होती. यावर त्वरित निर्णय घेतला असता, तर ही वेळ आली नसती. आमच्या मनात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कालही आदर होता. आजही आदर आहे. मी मुंबईला राज्यपालांना भेटण्यासाठी जातोय. त्यानंतर आमची पुढली रणनीती ठरवण्यात येईल, असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले.एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ते आजच राज्यपालांना भेटणार आहेत. याशिवाय आजच ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईत दाखल झाल्यावर शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा