Subscribe Us

header ads

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागरांच्या मागण्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसंदर्भात चर्चा

बीड स्पीड न्यूज 


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.संदीप क्षीरसागरांच्या मागण्या मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसंदर्भात चर्चा



बीड (प्रतिनिधी):- बीड मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवार (दि.२८) रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा केली व आढावा घेतला.यासोबतच मतदारसंघात आवश्यक असलेल्या कामांबाबत मागण्या केल्या.बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि.२८) रोजी जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी, बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व येथील ‌

परिसर सुशोभित करणे,पंचायत समिती बीड येथील नवीन इमारतीच्या आवारात स्व.आण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बसविणे, शहरातून जाणाऱ्या जालना रोड ते बार्शी रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाली बांधकाम करणे व विद्युत पोल स्थलांतर करणे, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना व प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या कामांचा आढावा घेऊन मतदारसंघातील ६४ किलोमीटरचे रस्ताकाम या कामांसाठी तात्काळ निधी देण्यात यावा अशी मागणी केली.यासोबतच शहरातील विद्युत रोहीत्र स्थलांतरित करणे व खाली आलेल्या धोकादायक विद्युत तारा नवीन बसविण्याची मागणी केली.तसेच 

मतदारसंघातील गावांना सिंगल फेजच्या नवीन डी.पी. मिळाव्यात व ज्याठिकाणी 63 KV ची डी.पी. आहे त्याठिकाणी 100 KV ची डी.पी. देण्यात यावी अशी मागणी केली.मतदारसंघातील अंजनवती व पाली या दोन्ही ठिकाणांच्या 33/11 के.व्ही. उपकेंद्राच्या पुढील कामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली.तसेच तालुक्यातील अंजनवती येथील 33/11 के.व्ही.चे उपकेंद्र सध्या पुर्णत्वास आले असून याबाबत सहकार्य केल्याबद्दल जिल्हा नियोजन समितीचे आभार आ.संदीप क्षीरसागर यांनी मानले.या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे आजारी असल्याने व्ही.सी.प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, आ.संदीप क्षीरसागर,आ.प्रकाश सोळंके,आ.बाळासाहेब आजबे जिल्हा नियोजन समिती सदस्य वाल्मीक कराड, अनिल जगताप आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा