Subscribe Us

header ads

संजीवनी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा- डाॅ. ज्ञानेश्वर गिलबिले.

बीड स्पीड न्यूज 



संजीवनी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा- डाॅ. ज्ञानेश्वर गिलबिले.

वडवणी प्रतिनिधी-: वडवणी तालुक्यातील चिंचवन या गावामध्ये डोंगर दर्यामध्ये राहून हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन अफाट मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले यांनी माजलगाव मध्ये संजीवनी हॉस्पिटल कार्यान्वित केले. तालुक्यातील व परिसरातील नागरिकांच्या उदंड प्रतिसादाने हॉस्पिटलचा प्रथम वर्धापनदिन गुरूवार  दिनांक 30 जून रोजी सकाळी ९:०० वाजता साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील व शहरातील गोरगरीब सर्वसामान्य माणसांसाठी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाला उद्घघाटक म्हणून बीड जिल्हा शल्यचिकित्सक मा.श्री सुरेश साबळे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच या शिबिरात खालील तज्ञ डॉक्टर तपासणी करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. त्यामध्ये डॉ. अनिल गवळी, डॉ दत्तात्रय किरडे,डाॅ उमेश घायतिडक, डाॅ. ज्ञानेश्वर रुईकर, डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले, डॉ. मोनिका पवार, डाॅ. पल्लवी गिलबिले यांची खास उपस्थिती असणार आहे. या शिबिरामध्ये अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये इंडॉस्कॉपी, कोलोनोस्कोपी, डिजिटल एक्स-रे, ईसीजी, ट्रेडमिल टेस्ट, रक्त, लघवी, साखरेची तपासणी इत्यादी महत्त्वाच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये अनेक विविध आजारांची तपासणी व उपचार करण्यात येतील त्यामध्ये मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब, हृदयविकार, दमा, मेंदूवरील जन्म गाठी, दुर्बीण द्वारे कान-नाक-घसा तपासणी, नाकाचे हाड वाढणे, वारंवार होणारे गर्भपात, स्त्री रोग चिकित्सा व सल्ला, प्रसूतिपूर्व चिकित्सा व मार्गदर्शन इत्यादी विविध आजारावर तपासणी होणार आहे. हे शिबिर छत्रपती संभाजी महाराज चौक बायपास रोड हॉटेल गार्डन समोर माजलगाव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. तरी या मोफत महारोग्य शिबिराचा माजलगाव तालुक्यातील व परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन विठ्ठल गिलबीले माजी सैनिक, नवनाथ गिलबीले,  डॉ ज्ञानेश्वर गिलबिले, डॉक्टर पल्लवी गिलबिले यांनी केले आहे. नोंदणीसाठी खालील नंबरवर संपर्क करावा.
9130894444,9604686777,8446596359.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा