Subscribe Us

header ads

टोकवाडीतील बोगस कामांच्या चौकशीची अजित पवार 11 जुलै रोजी घेणार सुनावणी - गौतम आगळे

बीड स्पीड न्यूज 


टोकवाडीतील बोगस कामांच्या चौकशीची अजित पवार 11 जुलै रोजी घेणार सुनावणी -  गौतम आगळे 
  

परळी|प्रतिनिधी-: टोकवाडीतील  बोगस कामांच्या  चौकशीची अजित पवार 11 जुलै 2022 रोजी घेणार सुनावणी तसे लेखी पत्र ‌जा.क्र. / साप्रवि - 7/पं -3/ कावि/ 2022 No 3485 दिनांक 5JUL2022 बीड उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प.) जिल्हा परिषद बीड यांनी कळविले आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते  गौतम आगळे  यांनी कळविले आहे. सविस्तर वृत्त असे की  टोकवाडी ग्रामपंचायतीत निकृष्ट दर्जाचे आणि बोगस कामे करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या गुत्त्तेदार आणि एजन्सी यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यमकारी अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर साखळी उपोषण करण्यात आले होते. या आंदोलनाची अजित पवार यांनी दखल घेतली होती. याप्रकरणी उद्या  20 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार  सूनावणी घेणार होते. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे सुनावणी रद्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदरील प्रकरणात दिनांक 11/07/2022  रोजी 11:00 वा. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड यांच्या दालनात संयुक्त सुनावणी ठेवण्यात आली  असल्याने याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते गौतम आगळे सर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे ता. महासचिव व टोकवाडीचे गावकरी विष्णू मुंडे वंचितांचे तालुका महासचिव  यांनी  बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालया समोर देन दिवस  साखळी उपोषणाला केले होते. गौतम आगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने चौकशीची मागणी अजित पवार यांना भेटून केली होती.याबाबत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, मातंग वस्तीतील मंजूर कामे परवानगी नसताना इतरञ निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. टोकवाडीत बुध्द विहाराच्या बाजूला सरफेस असताना तसेच रस्ता, नाल्या चांगल्या असतांनाही त्याच ठिकाणी कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार केला.  25/15 अंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी याबरोबरच एकाच ठिकाणी दोन दोन योजनेतील कामे करून बोगस बीले उचलण्यात आली याची चौकशी करावी. याची दखल घेत 11जुलै 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या दालना मध्ये दोन्ही बाजुची हेरिंग  (सुनावणी )  ठेवली आहे. यामध्ये दोषी वर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले आहे.जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन चालुच राहणार आहे. 
सदर मागण्यांसाठी  दि. 23 ,24 मे रोजी  वंचित बहुजन आघाडीचे परळी महासचिव विष्णू मुंडे,  राजू जोगदंड, साहेबराव रोडे ,कपील राठोड ,यशोदा राठोड ,कविता राठोड, दीपक राठोड या साखळी उपोषणास बसले होते. दरम्यान टोकवाडी गावावर परळी पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू मुंडे यांचे वर्चस्व आहे. या सुनावणीत अजित पवार काय निर्णय देतात याकडे परळी तालुक्याचे लक्ष लागले आहे. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते गौतम आगळे  यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा