Subscribe Us

header ads

नियोजन अभावी डावरगावचा विकास होईना

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी हाफीज हारून पठाण,बदनापूर

नियोजन अभावी  डावरगावचा विकास होईना 


दोन वर्षापासून प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे डावरगावचा विकास पूर्णत: खुंटला आहे. अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत.



प्रतिनिधी|बदनापूर-: तालुक्यातील डावरगाव ग्रामपंचायतीत प्रशासक लागू होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र ग्राम पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे डावरगावचा विकास पूर्णत: खुंटला आहे. अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या प्रश्न ऐरणीवर आल्या आहेत.सध्या गावची वाट लागली आहे. मात्र दोन वर्षापासून नियोजन शून्यतेमुळे व उदासीनतेमुळे गावाची विकासाकडे वाटचाल होऊ 

शकली नाही. दोन वर्षापासून प्रशासक म्हणून येथील सवीस्तार अधिकारी अथ्यक्ष, ग्राम सेविका सचिव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मात्र ज्या गतीने गावाचा विकास व्हायला पाहिजे होता, तसा विकासात गती आली नाही. विकास कामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणारा कर्तव्यदक्ष पदाधिकारी व सदस्याची गरज असते. मात्र गेल्या दोन 

वर्षात अशा प्रकारचा निधी खेचून विकास कामांना गती देणारा एकही पदाधिकारी नागरिकांना येथे पाहायला मिळाला नाही.गावात सगळीकडे घाणीचे  साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे पंचायतीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन येथे स्वच्छता करावी, तसेच रस्त्याची दुरूस्ती करावी तसेच नेमलेल्या प्रशासकाने गावाचा विकासाचा ध्यास घ्यावा, अशी मागणी गावातील नागरिक करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक