Subscribe Us

header ads

आज के एस के महाविद्यालयात 'लच्छी' आणि 'पाखर' या दोन लघुपटांच्या शो चे आयोजन

बीड स्पीड न्यूज 


आज केएसके महाविद्यालयात 'लच्छी' आणि 'पाखर' या दोन लघुपटांच्या शो चे आयोजन



बीड (प्रतिनीधी) सिंगापूर चित्रपट महोत्सव -2022 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करनारा व इतरही देश विदेशातील अनेक विविध पुरस्कारावर छाप सोडणारा बहुचर्चीत "लच्छी"  या लघुपटासोबतच "पाखर" हा नवाकोरा प्रयोगशील लघुपटही प्रेक्षकांना मोफत पहावयास मिळणार आहे. आज दि.09/07/2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता केएसके महाविद्यालय बीड यांच्या वतिने हे दोन्ही लघुपट पाहण्याची बीडकरांना संधी उपलब्ध होत आहे. याचा सर्व चित्रपट रसिकांनी   लाभ घ्यावा.हा  कार्यक्रम प्राचार्या दिपाताई क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मनीषाताई तोकले ह्या असणार आहेत. उपरोक्त दोन्ही लघूपट सामाजिक व शैक्षणिक आशयाशी निगडीत असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षिरसागर, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पाटील देवळणकर व दिग्दर्शक ॲड. सतिष धुताडमल यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा