Subscribe Us

header ads

नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्ट रोजी मतदान

बीड स्पीड न्यूज 

नगर परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; १८ ऑगस्ट रोजी मतदान

बीड|प्रतिनिधी-: अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर, गेवराईसह राज्यातील ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायतींचा समावेश बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, धारूर, गेवराईसह राज्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. १८ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. दरम्यान, आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. २९ जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी करून वैध उमेद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ४ ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. ५ ऑगस्ट रोजी चिन्हे वाटप होतील. तर १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या • कालावधीत मतदान होऊन १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीस सुरुवात होईल..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा