Subscribe Us

header ads

संभाजीनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते यांचा 15 आॕगस्ट पासून अमरण उपोषणाचा इशारा पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे साकडे

बीड स्पीड न्यूज 


संभाजीनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते यांचा 15 आॕगस्ट पासून अमरण उपोषणाचा इशारा पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे साकडे


किल्ले धारूर/ प्रतिनिधी:धारूर अतंर्गत संभाजीनगर भागातील  विवीध प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत हे जनतेचे मुलभूत प्रश्न आहेत हे तात्काळ मार्गी न लावल्यास पंचायत समिती कार्यालया समोर 15 आॕगस्ट पासून अमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्त्यानी   निवेदना द्वारे दिला आहे.धारूर लगत असलेल्या संभाजीनगर भागातील विवीध मागण्याचे निवेदन सामाजीक कार्यकर्त्यानी पंचायत समिती धारूर यांना दिले असून या मध्ये 1. मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावा 2. नियमित पाणी पुरवठा करणे शहरातील सार्वजनिक बोअरवेल हातपंप सुरु करणे. 3.भागातील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करून नागरीकांना वापरण्यास उपलब्ध करुन देणे. 4.भागात नेमित पणे स्वच्छ ठेवणे बाबत.5. स्वच्छतेसाठी कर्मचारी लावने,6. भागातील सार्वजनिक खांबावरील लाईट पथदिवे चालू ठेवणे.7.भागातील मोकळ्या जागेत उपद्रवी गवताचा विनाश करणे. 8.छ.संभाजी महाराज चौका साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, 9.घरकुल योजना गरो गरीबांना लाभ देण्यात यावा,10. कचरा कुंडी ची व्यवस्था करने.11 नागरिकांच्या घरासमोरिल रस्ते दुरुस्ती करून द्यावी.सर्व विषय आपले स्तरावर तात्काळ मार्गी लावण्यात यावेत, नसता 15 ऑगस्ट  पासून नगरपरीषद  कार्यालया समोर आमरण उपोषणा केले जाईल असा इशारा भागातील  सामाजीक कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.भागात मागील अनेक दिवसापासुन समस्या निर्माण झालेल्या आहेत, परंतु त्या समस्यांचे निराकरण न करता त्या दिवसे दिवस वाढत चाललेल्या आहेत. वरील सर्व विषय आपले स्तरावर तात्काळ मार्गी लावण्यात यावेत, नसता 15 ऑगस्ट  पासून आपल्या  कार्यालया समोर आमरण उपोषणा केले जाईल याची नोंद घ्यावी.यावेळी:- विशाल सराफ, बापूराव वराडे,अमोल मिसाळ, सिद्धेश्वर भारस्कळ,दत्ता खडमुळे,रवि फावडे,आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा