Subscribe Us

header ads

रोटरीकडून वारकर्‍यांची आरोग्यसेवा पाचशे जणांच्या तपासणीसह मोफत औषधोपचार

बीड स्पीड न्यूज 


रोटरीकडून वारकर्‍यांची आरोग्यसेवा पाचशे जणांच्या तपासणीसह मोफत औषधोपचार

बीड | प्रतिनिधी-: रोटरी क्‍लब ऑफ  बीडच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही निमा संघटना व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज पालखीतील वारकर्‍यांची बुधवारी आरोग्यसेवा करण्यात आली. या शिबीराचे उद्घाटन जगदीश काळे व  देवस्थानचे श्रीराम महाराज जोशी, सचिन रेवणवार यांच्या हस्ते करण्यात आले.रोटरी क्‍लब ऑफ  बीड, निमा संघटना व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने गत बारा वर्षांपासून संत गजानन महाराज यांच्या 

पालखीतील वारकर्‍यांकरिता मोफ त आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर आयोजीत करण्यात येते. गत दोन वर्षात कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे पायी पालखी सोहळा आयोजीत करण्यात आलेला नव्हता. यावर्षी संत गजानन महाराज यांची पालखी परत शेगावकडे जात असतांना बुधवारी बीड मुक्कामी होती. कंकालेश्‍वर मंदिर परिसरात पालखीचा मुक्काम असल्याने त्या ठिकाणी पालखीतील वारकर्‍यांची मोफ त आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यक असलेल्या वारकर्‍यांना औषधोपचोर करण्यात आले. या शिबीराचा पाचशेहून 

अधिक वारकर्‍यांनी लाभ घेतला. निमा संघटनेच्या वतीने जवळपास पन्नास डॉक्टर्सनी वारकर्‍यांची तपासणी केली. या शिबीरावेळी रोटरीचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव सुनिल जोशी यांच्यासह निमा संघटनेचे बीड अध्यक्ष डॉ.अजित जाधव, डॉ.संदिप बेदरे, डॉ.रमेश घोडके, डॉ.मनोज पोहनेरकर, वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे प्रशांत घुगरे, प्रोजेक्ट चेअरमन प्रमोद निनाळ, संदिप खोड, मेडीकल कमिटी चेअरमन राम मोटवाणी यांच्यासह रोटरी, निमा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा