Subscribe Us

header ads

ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

बीड स्पीड न्यूज 



ओबीसी आरक्षणासह होणार निवडणुका; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 

९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर होणार 

नवी दिल्ली - बांठिया आयोगानुसार पुढील निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून आता पुढील निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होतील.ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात यापूर्वी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल कोर्टात सादर केला होता. तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गरजेची असलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याचंही कोर्टात राज्य सरकारने म्हटलं होतं. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला बांठिया आयोगाच्या अहवालानुसार पुढील निवडणुका घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश

काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. या निवडणुका ऑगस्ट महिन्यात होणार होत्या. परंतु, राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत राज्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित दिली होती. मात्र आता, सर्वोच्च न्यायालयाने येत्या दोन आठवड्यांमध्ये निवडणुकीचा नवा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा