Subscribe Us

header ads

शहरातील मंजूर रमाई घरकुल आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे चेक ,आरटीजीस द्वारे तात्काळ वाटप करा

बीड स्पीड न्यूज 


शहरातील मंजूर रमाई घरकुल आवास योजना व पंतप्रधान आवास योजनेचे चेक ,आरटीजीस द्वारे तात्काळ वाटप करा

वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाचे मुख्याधिकारी कडे मागणी


बीड प्रतिनिधी/ दि.20 केंद्र सरकारकडून व महाराष्ट्र राज्य सरकारकडून बीड शहरातील गोरगरीब गरजूंना पंतप्रधान आवास योजनेच्या व रमाई घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजूर करण्यात आले आहेत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तीन-चार महिने झाले तरी अद्यापही चेकचे वाटप करण्यात आले नाही.लाभार्थी लोकांनी घरकुल बांधकाम सुरु केले आहेत परंतु पहिला हप्ता न मिळाल्याने बांधकाम रखडले आहेत. तसेच मंजुर हप्त्याचा चेक साठी न.प. कर्मचारी वर्गा कडुन पैश्याची 

मागणी होत आहे.या सर्व बाबींवर नगर पालिका प्रशासक यांनी लक्ष घालून त्वरीत चेकचे वाटप करण्यात यावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने लाभार्थी व्यक्तींना बरोबर घेऊन नगर पालिके समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.या मागणीचे साठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील निरिक्षक डॉ.नितिन सोनवणे, ज्ञानेश्वर कवठेकर,दगडु गायकवाड,पुष्पाताई तुरूकमारे, पुरुषोत्तम वीर,युनुस शेख,आनुरथ वीर, डॉ.गणेश खेमाडे,अजय सरवदे, अजय साबळे,तालुका अध्यक्ष किरण वाघमारे,श्रींकात वाघमारे,शहर अध्यक्ष लखन जोगदंड,संदिप जाधव, शेख मुबीन,सुशिल काकडे, मिलिंद सरपते विश्वजित डोंगरे,भैया जावळे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा