Subscribe Us

header ads

आई हा पहिला गुरु, शिक्षणापासून ते शेवटच्या क्षाणापर्यंत निस्वार्थ ज्ञान देतात ते सर्व गुरुच : वाय जनार्दन राव

बीड स्पीड न्यूज 

आई हा पहिला गुरु, शिक्षणापासून ते शेवटच्या क्षाणापर्यंत निस्वार्थ ज्ञान देतात ते सर्व गुरुच : वाय जनार्दन राव

रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या वतीने गुरुवंदन पुरस्काराचे वितरण

बीड|प्रतिनिधी-: प्रत्येकाच्या जिवनामध्ये अाई हा पहिला गुरु असताे. तिच्या प्रबळ इच्छशक्ती व सर्वव्यापी ज्ञानसंपदेची शिदाेरी ही अपत्यास मिळत असते. पुढे अायुष्यात शिक्षण व्यवस्था ते शेवटच्या क्षणापर्यंत निस्वार्थ ज्ञान देतात ते सर्व गुरु असतात त्यांच्या प्रेरणा-मार्गदर्शतून अापल्या जीवनाची जडणघडण घडत असे, असे प्रतिपादन राेटरी क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक वाय. जनार्दन राव यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब ऑफ बीड सेंट्रलच्या वतीने मंगळवारी (दि. १९) हाॅटेल अन्वीता  सभागृह येथे गुरू वंदन पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राव उपस्थित हाेते. कार्यक्रमास क्लबचे अध्यक्ष परमेश्वर जाधव, सचिव रवी उबाळे, प्राेजेक्ट चेअरमन गणेश वाघ, कचरु चांभारे यांची व्यवसपिठावर उपस्थित हाेती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब आश्रुबा सरपते, उत्तरेश्वर जगन्नाथराव सपाटे,  सुदर्शन विष्णुपंत धुतेकर,   प्रफुल्ल लक्ष्मणराव हाटवटे यांना राेटरी क्लब अाॅफ बीड संेट्रलच्या वतीने गुरुपाैर्णिमेनिमित्त गुरु वंदन पुरस्काराने गाैरविण्यात अाले.ज्येष्ठ मार्गदर्शक वाय जनार्दन राव म्हणाले, गुरूबंधवांचा गौरव करण्यात आला, ही मोठा आनंदाचा क्षण आहे. आठ वर्षांपासून हा क्लब चांगले विशेष कार्य करत आहे. दोन वर्षात कोरोना संकट हे सर्वांसाठी धाेकादायक हाेते. अाता सर्वच क्षेत्रामधील परिस्थिती बदलत अाहे. येणाऱ्या काळात सेंट्रल ने भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलनामधून गुरूचा महिमा वर्णन करत वारकरी संप्रदायातील गुरूपरंपरेचा वारसा कमी शब्दात उलघडा करुन ज्ञान दिल्याने वाढते याचा वसा गुरूजींना कसा जपला त्यातून गुरु-शिष्यपरंपरेचे अनंन्य महत्व ज्ञानेश्वर तांब  यांनी विषद केले.  प्राेजेक्ट चेअरमन गणेश वाघ  यांनी कार्यक्रमाची रुपरेषा प्रभावीपणे मांडली. क्लबचे अध्यक्ष परमेश्वर जाधव   यांनी शिक्षकांमधील प्रकार व विद्यार्थ्यांचा कल कसा असताे तसेच क्लबने शिक्षकांची निवड कशापध्दतीने केली याबद्दल स्पष्ट भूमीका मांडली. प्राेजेक्ट चेअरमन कचरु चांभारे   यांनी शिक्षणाबराेबरच विविध पाैर्णिमेचे महत्व सांगितले. या कार्यक्रमास  क्लबचे चार्टर्ड प्रेसीडेंट संदेश लाेळगे, अजय नाना घाेडके, महेश  जाेशी, डाॅ. सचिन वारे, सुकेश  राव, हेमंत बडवे, प्रमाेद  करमाळकर, सुहास बेदरे, अभिनंदन कांकरीया, समाधान कुलकर्णी, डाॅ. सुहास धुमाळ, गाेविंदजी बाहेती, अतुल  जाजू, गिरीश गिलडा, मुकेश अाग्रवाल, सुशील अब्बड, उमेश संचेती, प्रितेश संचेती, राजीव संचेती, अतुल जाजू, संदीप डाेंगरे, प्रमाेद करमाळकर, प्रदीप मालपाणी, डाॅ. शाम चरखा, नितीन सारडा, विश्वास शेंडगे यांच्यासह सर्व बाेर्ड अाॅफ डायरेक्टर, क्लबचे सदस्य व पदाधिकारी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे अाभार सचिव रवी उबाळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक