Subscribe Us

header ads

यंदाचा नागोत्सव मोठया उत्सवात साजरा होणार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचेश्री क्षेत्र नागोबा देवस्थान च्या वतीने आव्हान

बीड स्पीड न्यूज 


यंदाचा नागोत्सव मोठया उत्सवात साजरा होणार
 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे
श्री क्षेत्र नागोबा देवस्थान च्या वतीने आव्हान

बीड (प्रतिनिधी) 20 जुलै दर वर्षी श्रावन महिन्यात नागपंचमी उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो परंतु मागील तीन वर्षापासुन कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वच उत्सवार निर्बंध लादले गेल्याने जयंत्या, सन,उत्सव साजरे करता आले नाही यामुळे सर्वत्र दुःखा चे सावट पसरले होते. या वर्षी सर्व निर्बंध मागे घेतल्याने उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून 2 ऑगस्ट रोजी नागपंचमी असल्याने नागोबा गल्ली पेठ बीड येथील नागोत्सवाची जोरदार तयारी सुरु असून नागोबा गल्ली येथे नागोत्सव अतिशय उत्सवाने साजरा केला जातो मागील पन्नास वर्षाची या उत्सवाची परंपरा आबाधित असून येथील पुरातन नागोबाचे मंदिर सर्व धार्मियांचे श्रद्धास्थान आहे.दर वर्षी देवस्थान च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते या वर्षी हा उत्सव मोठ्या आनंदाने व उत्सवपूर्ण वातावारणात साजरा करण्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानच्या वतीने नगरसेवक अँड विकासजी जोगदंड, राजेशभाई कोकाटे,कल्याणराव गाडे, राजू फटाले, अँड सुरेश कांबळे,मंगलसिंग कपूर, दिपक सौदा,महादेव वंजारे, राजू जोगदंड, मुकेश कालिदास जोगदंड,लक्ष्मण जोगदंड,संजय कांबळे, गोरख जोगदंड, आकाश गायकवाड,सचिन जाधव,देवानंद कदम,श्रीनिवास इनकर,प्रवीण जोगदंड,सह आदींनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा