Subscribe Us

header ads

अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल प्रभागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करा अन्यथा आंदोलन - नवीद सिद्दिकी

बीड स्पीड न्यूज 


अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल प्रभागातील रखडलेली विकास कामे पूर्ण करा अन्यथा आंदोलन - नवीद सिद्दिकी 



माजलगाव (प्रतिनिधी) - शहरातील अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल प्रभागात रखडलेली विकास कामे पूर्ण करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एआयएमआयएम पक्षाचे युवा नेते नवीद सिद्दिकी यांनी  प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, माजलगाव शहरामधील फातिमा नगर, आरफात मोहल्ला, महेबूब नगर, चांदनी ग्राउंड या प्रभागातील विकास कामे अजूनही करण्यात आलेली नाही. कच्चे रस्ते, तुटक्या-फुटक्या नाल्या, यामुळे रस्त्यांवर येणारे सांडपाणी, त्यात पुन्हा पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाचे पाणी जमा होऊन या प्रभागातील रहिवाशांना व येथे ये-जा करणाऱ्यांना अक्षरशः नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. तसेच चांदनी ग्राउंड चा मंजरथ रोडला जोडणाऱ्या रस्त्याचे अर्धे काम करून अर्धे काम बाकी असताना ते पूर्ण न करता तसेच सोडून देण्यात आलेले आहे. हा ४० फुट रुंद असलेला रस्ता यामुळे बऱ्याच काळापासून अपूर्णावस्थेत पडून आहे. याकडे नगरपालिकेतील संबंधित पदाधिकारी  नगराध्यक्ष व आमदार यांचे  पूर्णतः दुर्लक्ष आहे. बिलाल मोहल्ला, आज़ाद नगर या प्रभागातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाने  माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना मोठ्या विश्वासाने भरभरून मतदान करून मोठ्या प्रमाणात मताधिक्य दिले होते. परंतु निवडून आल्यावर आमदार सोळंकेंनी शहरातील इतर  भागाच्या प्रमाणात  अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल असलेल्या प्रभागांकडे साफ दुर्लक्ष केले. ज्यात मुस्लिम बहूल प्रभागातील रस्ते,  नाल्या, लाईट, पाणी च्या समस्या प्रमुख आहेत.  नागरिकांच्या या मूलभूत गरजांवर कोणत्याही प्रकारचे काम आजपर्यंत ही करण्यात न आल्याने विद्यमान आमदार सोळंके यांच्या विरोधात जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला आहे. सोळंके यांच्या आमदारकीच्या उरलेल्या कार्यकाळात जर अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल प्रभागात आवश्यक असलेली  विकास कामे करण्यात आली नाही तर  माजलगावची जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम बहुल प्रभागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत अनेक तक्रारी आल्याने या प्रभागात जाऊन पाहणी केली असता येथील लोक जगताना कशा हाल-अपेष्टा सोसत आहेत ते दिसून आले. आता अल्पसंख्यांक मुस्लिम बहुल प्रभागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच विकास कामे सुरू करण्यासाठी  लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करणार असा इशारा एआयएमआयएम चे युवा नेते नवीद सिद्दिकी यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा