Subscribe Us

header ads

केज अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात दोन ठार

बीड स्पीड न्यूज 

केज अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात दोन ठार


केज|प्रतिनिधी-: रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून टायरमधील हवा तपासणाऱ्या चालक आणि क्लिनरला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात त्या दोघांचाही मृत्यू झाला. हा अपघात केज - अंबाजोगाई रोडवर चंदन सावरगाव येथे आज मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास झाला.अंबाजोगाकडून केजच्या दिशेने निघालेला ट्रक चंदन सावरगाव येथे थांबला होता. ट्रकचा चालक ताहेर हुसेन आणि क्लीनर इस्माईल (दोघेही रा. उत्तर प्रदेश) हे दोघे ट्रकच्या चाकातील हवा तपासत होते. यावेळी केजच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने (एमएच ४४/५१२) ट्रक चालक  आणि क्लीनरला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात गेली. कारमधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवी दिलीप मुंडे (रा. गोपाळपूर, ता. धारूर) हे गंभीर झाले असून त्यांच्यावर केजच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा