Subscribe Us

header ads

मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणार 1 ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम

बीड स्पीड न्यूज 



मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणार

1 ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम

 

बीड|प्रतिनिधी-: दि. 19  मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीतील नोंदीशी जोडला जाणार आहे. मात्र आधार क्रमांक जोडणे ही बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत व मतदार यादी शुध्दीकरणाच्या कामात यामुळे मदत होणार आहे. त्या अनुषंगाने दि. 1 ऑगस्ट 2022 पासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाचा विधी व न्याय मंत्रालय यांचेव्दारा लोक  प्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 तसेच मतदार नोंदणी अधिनियम 1960 यामध्ये दि. 30.12.2021 पासून सुधारणा केल्या आहेत. यामध्ये संबंधीत यादी भागामध्ये बीएलओ यांच्यामार्फत घरोघरी भेटी देऊन मतदारांचा आधार क्रमांक फॉर्म क्र. 6 ब व्दारे जमा करण्यात येणार आहे. यासाठी विशेष शिबीरांचेही आयोजन करण्यात येणार आहे व त्या मधूनही अर्ज क्र. 6 ब गोळा करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या 17 जून 2022 च्या अधिसूचनेनुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी मतदार यादीत नाव असलेली प्रत्येक व्यक्तीने त्याचा आधार अर्ज क्र.6 ब भरुन मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे ऐच्छिकरित्या  जमा करावा. प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. यासाठी अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रति मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच अर्ज क्र. 6 ब भारत निवडणूक आयोगाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in  या संकेत स्थळावर उपलब्ध करुर देण्यात येणार आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पध्दतीने आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO net, GARUDA App, NVSP, VHP  या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे. तरी मतदार यादीतील नावाशी 1 ऑगस्ट 2022 पासून मोठ्या संख्येने मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करुन घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा