Subscribe Us

header ads

महाजनवाडीत आयपीएस पंकज कुमावत यांची चंदन तस्कर वर कारवाई तब्बल 20 लाख 72 हजरांचा माल जप्त

बीड स्पीड न्यूज 

महाजनवाडीत आयपीएस पंकज कुमावत यांची चंदन तस्कर वर कारवाई तब्बल 20 लाख 72 हजरांचा माल जप्त

बीड|प्रतिनिधी  24 जुलै -: बीडमध्ये चोरीछुप्या मार्गाने चंदनाची तस्करी करणारी गॅंग सक्रीय आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील चंदनाची झाडे चोरून नेत असल्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली होती.या चंदन तस्करांच्या टोळीच्या मोरक्याला अखेर पकडण्यात बीड पोलिसांना यश आले. बीडच्या महाजनवाडी गावातून,तब्बल 599 किलो चंदनाच्या गाभ्यासह जवळपास 20 लाख 72 हजरांचा माल जप्त केला आहे. बीडच्या महाजनवाडी गावातील काही जण, चंदनाची तस्करी करत असून त्यांनी शिवारातील शेतातील चंदनाची झाडे चोरून तोडून आणले आहेत आणि आणलेल्या झाडांची खोडे तासून त्यातील गाभा काढून चोरटी विक्री करत आहेत, अशी माहिती आयपीएस कुमावत यांना मिळाली होती. माहितीवरून पंकज कुमावत यांच्यासह टीमने महाजनवाडी गावात छापा टाकला.यावेळी त्या ठिकाणी चंदनाची खोडे तासीत असणारा अशोक रामहारी घरत (राहणार, महाजनवाडी) हा आढळून आला. यावेळी त्याच्या घराची झडती घेतली असता, 499 किलो चंदनाचा तासलेला गाभा, लाकडे वजन काटा वाकस, कुऱ्हाडी आणि बोलेरो पिकअप असा एकूण 20 लाख 72 हजार 700 रुपयाचा माल जप्त केला. दरम्यान, याप्रकरणी चंदन तस्कर अशोक घरत याच्यासह 10 जणांविरुद्ध बीडच्या नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने चंदन तस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा